Covid काळात देशात पहिल्यांदाच लाँच होतंय मराठी चॅनेल; Music Channel ची Date ठरली

Covid काळात देशात पहिल्यांदाच लाँच होतंय मराठी चॅनेल; Music Channel ची Date ठरली

मार्चनंतर Covid लॉकडाऊन सुरू झालं. त्यानंतर देशात लाँच होणारं हे पहिलं चॅनल ठरणार आहे. Zee समूहाची लवकरच नवीन मराठी संगीत वाहिनी येणार आहे. कुठे दिसणार, कुठल्या दिवशी होणार लाँच आणि वाहिन्यांच्या अर्थकारणाविषयी...

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर : Coronavirus च्या काळात सगळ्याच व्यवसायांना मरगळ आली आहे. मंदीचे वारे वाहात असतानाच टेलिव्हिजन क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी आली आहे. ZEE ने नव्या मराठी म्युझिक चॅनेलची घोषणा केली आहे. त्यांनी ही वाहिनी सुरू करण्याची तारीखही जाहीर केली आहे. झी वाजवा असं या नव्या चॅनेलचं नाव आहे.

ZEE या व्यावसायिक माध्यम संस्थेच्या विविध प्रादेशिक भाषांमध्ये अनेक वाहिन्या आहेत. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश, बंगाली, गुजराती आणि इतर अनेक भाषांचा समावेश आहे. मात्र आता झी संगीताला वाहिलेली आपली नवीन मराठी वाहिनी घेऊन येत असून Zee Vajwa असं या चॅनलचं नाव आहे. 10 ऑक्टॉबर रोजी हे चॅनल लाँच होणार असून यावर केवळ मराठी गाणी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हे झीचं पहिलंच पूर्णवेळ गाण्यासाठी असलेलं मराठी चॅनेल असणार आहे. एप्रिलपासून लॉकडाऊन नंतर लाँच होणारे हे पहिलं चॅनल ठरणार आहे. या चॅनलवर 3000 हून अधिक गाणी पाहायला आणि ऐकायला मिळणार आहेत.

कोरोना काळात नवं चॅनल (तेही गाण्याला वाहिलेलं) सुरू करण्याचा धोका झी एंटरटेनमेंट समूहाने स्वीकारला आहे. Covid-19 च्या या संकटामुळे वाहिन्यांवरील जाहिरातींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. मात्र या चॅनलच्या बाबतीत कंपनीला खात्री असून हा प्रयोग नक्की यशस्वी होणार असल्याचा विश्वास झी एंटरटेनमेंट समूहाचे जाहिरात विभागाचे प्रमुख आशिष सेहगल यांनी व्यक्त केला.

सध्या कोरोनाच्या या संकटातून हळूहळू सगळेच व्यवसाय बाहेर येत आहेत. लवकरच IPL देखील सुरू होणार असून यादरम्यान जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणात गाणी लागणार आहेत. त्यामुळे या चॅनेलच्या माध्यमातून या गाण्यांना देखील एल प्लॅटफॉर्म निर्माण होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आम्ही ही नवीन वाहिनी काढण्याचा निर्णय घेतल्याचं  सेहगल यांनी सांगितलं. अनेकदा प्रेक्षक मालिकांपेक्षा गाण्याच्या चॅनलवर फार कमी वेळ असतात. मात्र या चॅनलवर जाहिरात देण्यासाठी जाहिरातदार उत्सुक असतात. इतर मनोरंजक वाहिन्यांच्या तुलनेत या चॅनलवर मोठ्या प्रमाणात जाहिराती असतात. त्याचबरोबर ग्रामीण भागात पोहोचण्यास देखील या गाण्यांच्या चॅनलचा कंपनीला मोठा उपयोग होणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले. या चॅनलवर असणारे जाहिरातींचे दर हे खूप कमी असल्याने जाहिरातदारांचा ओढा हा या चॅनलकडे जास्त असतो.

काय आहेत जाहिरातींचे दर?

मालिका आणि संगीत अशा दोन चॅनलमधील जाहिरातींचा दर पाहायचा झाल्यास गाण्याच्या चॅनेलवरील जाहिरातींचा 10 सेकंदासाठीचा दर हा 1000 ते 1500 रुपयांपर्यंत आहे. इतर मनोरंजन वहिन्यांवर हाच दर 10 सेकंदासाठी 20 हजार ते 40 हजार रुपये इतका आहे. मनोरंजन वगळता इतर चॅनलवर हाच दर 15 हजार ते 20 हजाराच्या दरम्यान आहे. त्यामुळे अनेक छोट्या जाहिरातदारांसाठी म्युझिक चॅनल खूप उत्तम प्लॅटफॉर्म ठरू शकतो. महाराष्ट्रात 50 टक्के जाहिराती या रिटेल व्यवसायासंबंधी येतात. मात्र स्पोर्ट्स चॅनेल, सिनेमाची चॅनेल्स आणि इतर मनोरंजनविषयक चॅनलवर जाहिरातींचे दर जास्त असतात. त्यामुळे छोट्या जाहिरातदारांच्या जोरावर म्युझिक चॅनेल मोठी बाजी मारू शकतात.

गाण्यांच्या या चॅनल बरोबरच झीचा शिक्षण, टेक्नोलॉजी, गेमिंग, औषधं यांसारख्या विषयांवर चॅनल सुरू करण्यासंबंधी विचार सुरू आहे. या गोष्टींना देखील मोठी मागणी आहे. सध्या मराठीमध्ये 9X Jhakaas आणि संगीत मराठी नावाची दोन म्युझिक चॅनल्स असून झी चं हे झी वाजवा चॅनल यांना उत्तम पर्याय ठरू शकतो.

संगीत आणि मराठी : एक अतूट नातं

संगीत हा व्यावसायिक दृष्ट्या मनोरंजन क्षेत्रात फायद्याचा विषय नसूनदेखील झी या मध्ये का उतरली याचं उत्तर देताना 'झी'च्या संगीत विभागाचे डेप्युटी बिझनेस हेड पंकज बलहरा म्हणाले, "मराठी ही चौथ्या क्रमांकाची मोठी भाषा आहे. पण मराठी संगीताविषयी बोलायचं झाल्यास देशात मराठी संगीत ऐकणाऱ्यांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबीनंतर सर्वात जास्त मराठी संगीत ऐकलं जातं." पंजाबीमध्ये आठ संगीत चॅनल असून मराठीमध्ये केवळ तीन संगीत चॅनल असल्याचं त्यांनी सांगितलं. संपूर्ण देशाचा विचार करायचा झाल्यास महाराष्ट्रात 14 टक्के दर्शक असल्याचं बार्कच्या डेटामध्ये दिसून आलं आहे. ही खूप मोठी दर्शक संख्या आहे. सध्या झी समूहाची मराठीमध्ये झी मराठी, झी टॉकीज, झी युवा अशी चॅनल आहेत. तर संगीतामध्ये झी सध्या झिंग आणि झी एटीसी बॉलिवूड ही दोन चॅनल्स चालवतं.

ऑनलाईन संगीताची लढाई

सध्याच्या इंटरनेटच्या युगात संगीत चॅनलला ऑनलाईन संगीत पोर्टल मोठे स्पर्धक आहेत. सध्या देशभरात 17 हिंदी आणि 43 प्रादेशिक चॅनल असून अनेक संगीत अॅप्स देखील आहेत. यामध्ये YouTube, Caravan, Torrent आणि इतर संगीताच्या Apps चा समावेश आहे.

कंटेंटचे हक्क

या चॅनलवर दाखवण्यात येणाऱ्या गाण्यांसाठी सर्वात मोठी गरज आहे संगीत वाजवण्याच्या हक्कांची. ही Zee Music Company आणि Zee Studio Marathi पूर्ण करणार आहेत. त्यामुळे या चॅनलवर दाखवण्यासाठी गाण्यांची संख्या कमी नाही. त्याचबरोबर इतर ठिकाणाहून देखील याबद्दलचे अधिकार विकत घेण्यात येऊ शकतात. त्याचबरोबर कंपनीकडे मोठ्या प्रमाणात गाणी असून सध्या कोरोनाच्या संकटामुळे यावर काहीही परिणाम होणार नाही. मोठ्या प्रमाणात गीतकार आणि गायक आपली गाणी रिलीज करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून हे हक्क विकत घेऊन देखील या चॅनलवर गाणी दाखवली जाऊ शकतात.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 15, 2020, 6:45 PM IST

ताज्या बातम्या