Elec-widget

विवेक ओबेरॉयनंतर 'हा' प्रसिद्ध दिग्दर्शक करतोय मोदींवर नव्या सिनेमाची निर्मिती

विवेक ओबेरॉयनंतर 'हा' प्रसिद्ध दिग्दर्शक करतोय मोदींवर नव्या सिनेमाची निर्मिती

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'मन बैरागी' सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं.

  • Share this:

मुंबई, 17 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आलेल्या बायोपिकनंतर बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सुद्ध नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर एक सिनेमा तयार करत आहेत. या सिनेमाचं पहिलं पोस्टर आज नरेंद्र मोदीच्या वाढदिवसाला म्हणजेच 17 सप्टेंबरला रिलीज झालं. 'मन बैरागी' नावाचा हा सिनेमा पंतप्रधान मोदींच्या जीवनातील माहित नसलेल्या पैलूंवर आधारित असणार आहे.

अभिनेता अक्षय कुमारनं या सिनेमाचं पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं. या पोस्टरवर मन बैरागी जब मै मुजसे मिला अशी टॅगलाइन पाहायला मिळत आहे. या सिनेमात नरेंद्र मोदींची भूमिका कोण साकारणार हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही. पण हा सिनेमा हिवाळ्यापर्यंत प्रेक्षाकांच्या भेटीला येईल असं पोस्टरवर दिसत आहे.

...अन् रणवीर सिंहची पत्नी असल्याचं सांगायला विसरली दीपिका पदुकोण

Loading...

 

View this post on Instagram

 

‪Happy to present the first look of Sanjay Leela Bhansali & Mahaveer Jain’s special feature, #MannBairagi on the defining moment of our PM's life on his birthday! #HappyBirthdayPMModi‬ @narendramodi @bhansaliproductions

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित असेलेल्या या सिनेमाची निर्मिती दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि महावीर जैन मिळून करत आहेत. या सिनेमाची कथा संजय त्रिपाठी यांनी लिहिली आहे. तर दिग्दर्शन संजय लीला भन्साळी करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या आयुष्यातील एका निर्णयक क्षणावर आधारित हा सिनेमा असून पूर्ण गांभीर्य आणि प्रामाणिकपणे या सिनेमाची निर्मिती केली जात आहे.

वाचा : विराटच्या 'हृदयात' आहे अनुष्का, हा फोटो होतोय तुफान VIRAL

मोदींच्या आयुष्यानं प्रेरित झाले भन्साळी

मोदींवर तयार होत असलेल्या या सिनेमाविषयी भन्साळी सांगातात, या कथेतील जगाला प्रभावित करणाऱ्या संदेशानं मला प्रेरित केलं आहे. या सिनेमासाठी आम्ही बरंच संशोधनही केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या तरुण वयात आलेल्या टर्निंग पॉइन्टनं मला खूपच इम्प्रेस केलं आहे. ही कथा वाचल्यावर मला वाटलं की हे अद्याप कोणालाच माहित नाही आणि ते सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे.

ही एक ह्यूमन इंट्रेस्ट स्टोरी

या सिनेमाच्या कथेचे लेखक संजय त्रिपाठी यांच्या मते, हा सिनेमा प्रत्येक भारतीयाच्या मनाला भावेल. माझ्यासाठी ही एक ह्यूमन इंट्रेस्ट स्टोरी आहे. ही एका माणसानं स्वतःला शोधण्याची कथा आहे. जो पुढे जात राहिला आणि देशाचा सर्वात मजबूत नेता झाला.

बॉयफ्रेंडसोबत यॉर्टवर Romantic झाली सुश्मिता सेन, चाहत्यांनी दिल्या HOT कमेंट

==============================================================

CCTV VIDEO: ठाण्यात लिफ्टवरून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 12:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...