Home /News /entertainment /

जळणाऱ्या चितेकडे एकटक बघत राहिले झाकीर हुसैन; पंडित शिवकुमार शर्मांच्या अंत्यविधीतले हृदयस्पर्शी फोटो

जळणाऱ्या चितेकडे एकटक बघत राहिले झाकीर हुसैन; पंडित शिवकुमार शर्मांच्या अंत्यविधीतले हृदयस्पर्शी फोटो

अंत्यसंस्कारासाठी पार्थिव (Deadbody) नेत असताना झाकिर हुसैन यांनी त्यांना खांदा दिला. अंत्यसंस्कार विधीनंतर सर्व जण घरी परतले; मात्र झाकीर हुसैन पंडितजींच्या चितेजवळ (Pyre) एकटेच शांत उभे होते.

नवी दिल्ली 14 मे : असं म्हणतात, की 'मैत्री' (Friendship) हे जगातलं सर्वांत सुंदर नातं आहे. अगदी प्राण्यांनाही (Animal) मैत्रीची आणि प्रेमाची भाषा समजते. माणसाच्या (Human) मैत्रीबद्दल तर काय बोलावं. एकदा एखाद्या व्यक्तीचा लळा लागल्यानंतर ते नातं सहजासहजी तुटत नाही; मात्र अचानक एक दिवस आपला जीवलग मित्र (Close Friend) आपल्याला सोडून गेला तर? आपलं मन सैरभैर झाल्याशिवाय राहत नाही. प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसैन (Zakir Hussain) सध्या याच परिस्थितीतून जात आहेत. प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार आणि संतूरवादक (Santoor Player) पंडित शिवकुमार शर्मा (Shivkumar Sharma) यांचं मंगळवारी (10 मे) हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांनी वयाच्या 83व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जवळचे नातेवाइक आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. पंडित शिवकुमार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चित्रपट आणि संगीत जगतातले अनेक दिग्गज उपस्थित होते; मात्र तबलावादक झाकीर हुसैन यांच्या उपस्थितीनं वातावरण आणखी जास्त भावूक (Emotional) झालं. झाकीर हुसैन यांचे पंडित शिवकुमार शर्मा यांच्या अंत्यविधीतले फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 'पंजाब केसरी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. Pandit Shivkumar Sharma Death: प्रसिद्ध संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा काळाच्या पडद्याआड भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रामध्ये संतूर या वाद्याला मानाचं स्थान मिळवून देण्याऱ्या पंडित शिवकुमार शर्मा यांच्या पार्थिवावर बुधवारी (11 मे) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी पार्थिव (Dead body) नेत असताना झाकिर हुसैन यांनी त्यांना खांदा दिला. अंत्यसंस्कार विधीनंतर सर्व जण घरी परतले; मात्र झाकीर हुसैन पंडितजींच्या चितेजवळ (Pyre) एकटेच शांत उभे होते. चितेच्या ज्वाळांकडे बघत असलेल्या झाकीर यांच्या डोळ्यांमध्ये मित्र गमावल्याचं दु:ख (Grief) स्पष्टपणे दिसलं. संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा आणि तबलावादक झाकीर हुसैन यांनी अनेक वर्षांपासून एकत्र स्टेज शो (Stage Show) केले आहेत. पंडितजींच्या जाण्यामुळे झाकीर यांनी एक चांगला मित्र गमावला आहे. स्टेजवरच्या आपल्या साथीदाराला अखेरचा निरोप देतानाचे झाकीर यांचे फोटोज सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. त्यांच्या या फोटोजनी सर्वांना भावूक केलं आहे. एका सोशल मीडिया युझरने हे फोटोज शेअर करून इमोशनल कमेंट केली आहे. 'पंडित शिवकुमार शर्मा यांच्या अंत्यसंस्कार विधीमध्ये उस्ताद झाकीर हुसैन आपल्या अनेक दशकांच्या मित्राला निरोप देताना. या दोघांनी रंगमंचावर कित्येक वेळा जादू दाखवली होती. असे हृदयस्पर्शी (Heart Touching) फोटो कधीच पाहिले नाहीत,' अशी ही कमेंट आहे. अन्य एका युझरने म्हटलं आहे, 'कोण म्हणतं, की हिंदू-मुस्लिम एक होऊ शकत नाहीत.' दरम्यान, शुक्रवारी पंडित शिवकुमार शर्मा यांच्या अस्थी गंगेमध्ये विसर्जित करण्यात आल्या. त्यांचा मोठा मुलगा रोहित, धाकटा मुलगा आणि शिष्य राहुल हे मुंबईहून हरिद्वारला अस्थिकलश घेऊन गेले होते.
First published:

Tags: Emotional, Funeral

पुढील बातम्या