जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Yo Yo Honey Singh : 'मी रात्रंदिवस मृत्यूसाठी...', हनी सिंहचा धक्कादायक खुलासा

Yo Yo Honey Singh : 'मी रात्रंदिवस मृत्यूसाठी...', हनी सिंहचा धक्कादायक खुलासा

यो यो हनी सिंह

यो यो हनी सिंह

प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंह कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच हनी सिंहचा घटस्फोट झाला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 1 जानेवारी : प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंह कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच हनी सिंहचा घटस्फोट झाला. यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. हनी सिंह त्याच्या लव्ह लाईफमुळेही अनेकदा चर्चेत असतो. अशातच हनी सिंह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हनी सिंहने नुकतंच त्याच्या आयुष्यातील चढ-उतारांबद्दल सांगितलं. या काळात त्याचे मानसिक आरोग्य कसे होते या विषयी त्याने खुलासा केला. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हनी सिंगने सांगितले की, तो अनेक वर्षांपासून डिप्रेशनमध्ये आहे. पत्नीसोबतच्या बिघडलेल्या नात्यामुळे खूप दुखावल्याचे त्याने सांगितले. पण काही लोकांनी त्यांना वाईट काळात साथ दिली. आपल्या मानसिक आरोग्याबद्दल बोलताना हनीने सांगितले की तो रोज मृत्यूसाठी प्रार्थना करत असे. मधूनच मूड स्विंग इतके व्हायचे की त्याला स्वतःलाही ते समजत नव्हते. मी वेडा झालो होतो, मी कामात आणि दारूमध्ये इतका मग्न होतो की मी धूम्रपान करायचो.  आजार समजायला मला तीन वर्षे लागली. चार वर्षे लढायला लागली. हेही वाचा -  Sana Saeed : शाहरुखच्या ऑनस्क्रीन लेकीचा साखरपुडा, गुडघ्यावर बसून हटके अंदाजात केलं प्रपोज हनी सिंगचा असा विश्वास आहे की, तुम्हाला चिंतेसाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांशी किंवा मित्रांशी बोला, दारू पिऊ नका. तुम्ही जितक्या जास्त गोष्टी कराल तितकी तुम्हाला मदत मिळेल. त्याच्या नैराश्याच्या दिवसांबद्दल बोलताना हनी सिंग म्हणाला की, नैराश्याशी लढण्यासाठी त्याला औषधांचा सहारा घ्यावा लागला. आताही तो मानसिक आरोग्यासाठी औषध घेतो. जरी तो पूर्वी 200 मिलीग्राम औषध घेत असे, जे आता फक्त 5 मिलीग्रामच्या डोसवर पोहोचले आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, हनी सिंहची पत्नी शालिनी तलवारने हनी सिंहवर शारीरिक हिंसा, लैंगिक हिंसा, मानसिक छळ आणि आर्थिक हिंसाचाराचे आरोप केले होते. शालिनी तलवारने हनी सिंहबद्दल अनेक मोठे खुलासे करत त्याच्या कुटुंबावरही अनेक आरोप केले होते. हनी सिंहवर फसवणूक केल्याचा आरोपही केला होता. हनी सिंहचे इतर महिलांसोबतही संबंध असल्याचा खुलासाही तिनं दाखल केलेल्या याचिकेत केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात