Home /News /entertainment /

मी पुन्हा येईन वाटत होतं पण.. '; येऊ कशी तशी मी नांदायला फेम मोहितची भावुक पोस्ट

मी पुन्हा येईन वाटत होतं पण.. '; येऊ कशी तशी मी नांदायला फेम मोहितची भावुक पोस्ट

झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला (yeu kashi tasi me nandayla) ही मालिका आता काही दिवसातच प्रेक्षकांचा (yeu kashi tasi me nandayla last episode) निरोप घेणार आहे. यात मोहितची नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता निखिल राऊत ( nikhil raut )मालिकेला निरोप देतान भावनिक झालाआहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 फेब्रुवारी- झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला (yeu kashi tasi me nandayla) ही मालिका आता काही दिवसातच प्रेक्षकांचा (yeu kashi tasi me nandayla last episode) निरोप घेणार आहे. या जागी एक नवीन मालिका दिसणार आहे. मात्र मालिक संपणार म्हटल्यांवर यातील कलाकार देखील भावुक झाले आहेत. काही दिवसापूर्वी या मालिकेतील स्वीटू देखील शुटिंगच्या शेवटच्या दिवशी भावुक झाली होती. आता या मालिकेत मोहितची नकारात्मक भूमिका साकारणारा  अभिनेता निखिल राऊत ( nikhil raut )मालिकेला निरोप देतान भावनिक झालाआहे. सोशल मीडियावर त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. मोहित फेम निखिल राऊतने फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, अखेर येऊ कशी तशी मी नांदायला या आमच्या मालिकेच्या शेवटच्या भागाचं चित्रीकरण नुकतंच पार पडलं... मी गेली २० वर्ष ह्या क्षेत्रात काम करत आहे ही माझी २५ वी मालिका.खरं तर माझं पात्र ' मोहित ' हे डिसेंबर महिन्यातच संपलं होतं परंतू 'मी पुन्हा येईन ' 'मी पुन्हा येईन ', असं प्रेक्षकांना वाटत होतं ,मला देखिल ते आवडलं असतं परंतू कथेचा शेवट जवळ आला आणि पुढच्या महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. प्रेक्षकांनी ,चाहत्यांनी ह्या मालिकेला, खलनायक असलो तरीही माझ्या 'मोहित ' या पात्राला आणि आम्हा सर्वांच्याच पात्रांना खूप भरभरून प्रेम दिलं त्या बद्दल मनापासून आभार. वाचा-आशुतोष देशमुख कुटुंबासमोर देणार अरुंधतीवरील प्रेमाची कबुली तसंच या मालिकेत काम करण्याची संधी दिल्या बद्दल Trump card productions निर्माते - तेजेंद्र नेसवणकर ,सुवर्णा रसिक राणे आणि झी मराठी वाहिनीचे निलेश मयेकर सर , सोजल सावंत, रेणूका जोशी, सिद्धार्थ मयेकर तसेच संपूर्ण झी मराठी वाहिनी चेही मनापासून आभार. लेखक -सुखदा आयरे, पल्लवी करकेरा, किरण कुलकर्णी , समीर काळभोर तसेच , दिग्दर्शक -अजय मयेकर , हरिष शिर्के , Direction team, उत्तम production team ,माझे spot boys मित्र आणि माझ्या सर्व सहकलाकार मित्रांचे पण खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांमुळे मोहित हे पात्र साकारता आलं. Thank you so much Love you all ❤️. भेटूया लवकरच.... निखिलने मालिकेत नकारात्म पात्र साकारले होते. मालिकेत त्याचं आणि स्वीटूचे लग्न झाल्याचे दाखवण्यात आले होते. यावरून मालिका मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली होती. विशेष म्हणजे निखिलला देखील यावरून ट्रोल करण्यात आलं होतं. आता तो मालिकेत दिसत नाही मात्र मालिका निरोप घेणार म्हटल्यांवर त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

    पुढील बातम्या