जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रुपये कापा’; या व्हिडीओमुळं स्विटूच्या आईची उडवती जातेय खिल्ली

‘ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रुपये कापा’; या व्हिडीओमुळं स्विटूच्या आईची उडवती जातेय खिल्ली

‘ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रुपये कापा’; या व्हिडीओमुळं स्विटूच्या आईची उडवती जातेय खिल्ली

‘कंगवा घ्यायला नाहित पैसे अन् मोबाईल जाळते’; ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेच्या या व्हिडीओला केलं जातंय ट्रोल

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई**, 17** जून- ‘येऊ कशी तशी मी नांदायला’(Yeu Kashi Tashi Mi Nandayla) ही छोट्या पडद्यावरील सध्याच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत प्रेक्षकांना सतत टर्न आणि ट्विस्ट पाहायला मिळतात. सध्या यामध्ये ओम(Om) आणि स्वीटूची (Sweetu) लव्हस्टोरी दाखवण्यात येत आहे. मात्र त्याच्या या प्रेमकथेला स्वीटूच्या आईचा विरोध आहे. नुकताच मालिकेचा एक नवा प्रोमो रिलीज झाला. यामध्ये देखील ती स्वीटूबाबत संताप व्यक्त करताना दिसत आहे. विशेष म्हणजे दोघांचं संभाषण थांबवण्यासाठी ती स्वीटूचा फोन चक्क आगीत फेकून देते. हा प्रोमो पाहून मालिकेचे चाहते आश्चर्यचकित झाले. व त्यांनी स्विटू आणि ओमच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली. तर दुसरीकडे काही टीकाकारांनी हा व्हिडीओ पाहून स्वीटूच्या आईची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. “अरे हिच्याकडे कंगवा घ्यायला पैसे नाहीत आणि ही मोबाईल जाळते आहे”, “यांचे ओव्हर अॅक्टिंगचे पंन्नास रुपये कापा” अशा आशयाच्या कमेंट्स करत ट्रोलर्सने या सीनची यशेच्च खिल्ली उडवली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. Yoga day special: मराठमोळ्या अभिनेत्रीचा मुंबईच्या रस्त्यावर Hot Yoga

जाहिरात

महात्मा गांधींचा करिश्मा; भारतीय डॉक्युमेंट्रीला New York मध्ये बेस्ट फिल्मचा पुरस्कार झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. यातील स्वीटू आणि ओमच्या प्रेमाने तर चाहत्यांना अक्षरशः भुरळ पाडली आहे. मालिकेत हे दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. ओमने तर वेळोवेळी आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. मात्र या दोघांच्या मध्ये असणाऱ्या आर्थिक दरीमुळे स्वीटूच्या आईने तिला आपलं प्रेम व्यक्त करण्यापासून परावृत्त केलं. त्याचबरोबर ओमच्या बहिणीने सुद्धा वेळोवेळी या दोघांना दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या सर्वांमध्ये स्वीटूने आपल्या प्रेमाचा त्याग केला होता. सध्या मालिकेत हेच कथानक चालू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात