मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO : "स्वराज्य सौदामिनी ताराराणी" मालिकेच्या चित्रीकरणावेळी घोडा अचानक बिथरला आणि काळजाचा ठोका चुकला....

VIDEO : "स्वराज्य सौदामिनी ताराराणी" मालिकेच्या चित्रीकरणावेळी घोडा अचानक बिथरला आणि काळजाचा ठोका चुकला....

सोनी मराठीवरील (sony marathi)  ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ( swarajya saudamini tararani latest episode  ) मालिकेच्या चित्रीकरणावेळी घो़डा अचानक बिथरला मग काय झालं यासंबंधी एक व्हिडीओ अमोल कोल्हे यांनी शेअर केला आहे.

मुंबई, 22 नोव्हेंबर:सोनी मराठीवरील (sony marathi)  ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ( swarajya saudamini tararani latest episode  ) या मालिका नुकतीच सुरू झाली आहे. प्रेक्षकांचा या मालिकाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेचे निर्माते आणि अभिनेते अमोल कोल्हे (dr amol kolhe) यांनी नुकताच या मालिकेतील एक अवघड सीन कसा शूट करण्यात आला याबद्दल माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी ऐतिहासिक मालिका साकारणे किती अवघड असतं याचा अनुभव सांगितला आहे. यासोबतच यासंबंधी एक व्हिडीओ देखील त्यांनी पोस्ट केला आहे.

अमोल कोल्हे यांनी इन्स्टावर व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे की, इतिहास साकारण्यासाठी जिगर लागते! कारण ऐतिहासिक मालिका म्हटलं की साहसदृष्ये आणि घोडेस्वारी या अविभाज्य गोष्टी. पण कधी कधी सर्व खबरदारी घेऊनही अपघात घडतात आणि काळजाचा ठोका चुकतो. अचानक घोडा बिथरण्यामुळे काय प्रसंग ओढवू शकतो याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे.

वाचा: Shocking Eviction : बिग बॉस मराठीच्या घरातील सारंगे गर्ल स्नेहा वाघ आऊट

परवा "स्वराज्य सौदामिनी ताराराणी" मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी पुन्हा हा अनुभव आला. सरसेनापती संताजीराव घोरपडे यांची भूमिका करणाऱ्या अमित देशमुख यांचा घोडा अचानक बिथरला आणि काळजाचा ठोका चुकला. सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही. परंतु मानलं अमित देशमुख यांना. पुन्हा सावरून घोड्यावर स्वार होऊन प्रसंग चित्रित केला. ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी जिगर लागते हे अमित देशमुख यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

View this post on Instagram

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

“स्वराज्य सौदामिनी ताराराणी” मालिकेत महाराणी ताराराणी यांची भूमिका स्वरदा ठिगळे ही अभिनेत्री साकारत आहे. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत मात्र स्वरदाच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स या मालिकेची निर्मिती करत असून आतापर्यंत स्वराज्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडणाऱ्या मालिका या निर्मितीसंस्थेने प्रेक्षकांना दिल्या आहेत. स्वराज्य सौदामिनी ताराराणी सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता सोनी मराठी वर लागते.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment, TV serials