मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

OMG! डान्स करता करता सर्वांसमोरच बदलले अंगावरील कपडे; अभिनेत्रीचा VIDEO VIRAL

OMG! डान्स करता करता सर्वांसमोरच बदलले अंगावरील कपडे; अभिनेत्रीचा VIDEO VIRAL

अभिनेत्री शिवांगी जोशी क्यूट लूकमधून अचानक ग्लॅमरस लूकमध्ये दिसते.

अभिनेत्री शिवांगी जोशी क्यूट लूकमधून अचानक ग्लॅमरस लूकमध्ये दिसते.

अभिनेत्री शिवांगी जोशी क्यूट लूकमधून अचानक ग्लॅमरस लूकमध्ये दिसते.

मुंबई, 25 ऑगस्ट :  फिल्ममध्ये आपण हिरो-हिरोईनना डान्स करताना आपण वेगवेगळे ड्रेस बदलताना पाहिला आहे. अर्थात तो एडिटिंगचा भाग असतो. तरी जेव्हा शूटिंगबाबत आपल्याला काही माहिती नसतं, तेव्हा ते आपल्यासाठी नवलच असतं. असंच काहीसं डान्स करता करता ड्रेस बदलण्याचा प्रयत्न केला तो अभिनेत्री शिवांगी जोशीने (Shivangi Joshi).

शिवांगी जोशी गेल्या 12 वर्षांपासून लोकांची आवडती मालिका असलेल्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kahlata Hai) या मालिकेतील सीरत (Sirat) ही मुख्य भूमिका साकारणारी एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिवांगी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. नुकताच तिने आपला एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यात तिने डान्स करता करताच आपले अंगावरील ड्रेस बदलला आहे.

या व्हिडिओमध्ये शिवांगी उर्फ सीरत तिच्या डान्स मुव्ह्ज दाखवत आहे. त्यावेळी  सुरुवातीला शिवांगीने मोठी हुडी घातली आहे. तसंच केसाचे दोन बाजूला दोन बन्स केले आहेत. अशा अवतारात नाचता नाचता ती अचानक ग्लॅमरस (Glamorous) अवतारात समोर येते. कपडे बदलल्यानंतर शिवांगी जोशी नारंगी रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये दिसते. तिची  हेअर स्टाईलही (Hair Style) बदललेली दिसते.

हे वाचा - 'पोन्नियिन सेलवन'मधील ऐश्वर्या रायचा लूक लीक; पाहताच चाहत्यांची आतुरता वाढली

शिवांगी जोशीचा हा फ्लर्टी अवतार चाहत्यांना खूपच आवडला असून, तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अतिशय सुंदर अशा शिवांगीचे हे अवखळ आणि ग्लॅमरस रूप चाहत्यांना वेड लावत आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरील या व्हिडिओला अक्षरश: लाखो लाईक्स मिळाल्या आहेत.  शिवांगी जोशीच्या उदंड लोकप्रियतेची झलक यातून सहज दिसून येते.  ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील तिची भूमिका, तिचं काम आवडत असल्याचेच हे चिन्ह आहे.

हे वाचा - शिल्पा शेट्टी ते ऐश्वर्या राय, पस्तीशीनंतर आई बनल्या 'या' अभिनेत्री

दरम्यान, या मालिकेत तिच्या भूमिकेला नवीन वळण मिळाले आहे. अलीकडेच सीरत आणि कार्तिक पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांच्या लग्नानंतर काहीतरी मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही उत्सुकता वाढली आहे. गेल्या 5 वर्षांपासून या मालिकेचा मुख्य भाग असणारा अभिनेता मोहसीन खान आता ही मालिका सोडणार आहे. चित्रपट आणि वेब सिरीजसाठी तो प्रयत्न करत असल्यानं त्यानं मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. निर्माते आणि मोहसीन खान यांच्यात चर्चा सुरू असून,  मोहसीन खान आपला विचार बदलतो की तो या मालिकेतून कायमचा निरोप घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First published:

Tags: Actress, Entertainment