मुंबई,4 नोव्हेंबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतमला (Yami Gautam) दिवाळीचा (Diwali 2021) सण खूप आवडतो. काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. लग्नानंतर तिची ही पहिलीच दिवाळी आहे. याच वर्षी तिने चित्रपट निर्माता आदित्य धरशी लग्न केलं आहे. त्यामुळे यामी आणि आदित्य दोघांसाठी ही दिवाळी खूप खास आहे. दिवाळी सेलिब्रेशनच नियोजन या दोघांनी फार होत. अलीकडेच एका मुलाखतीत यामीने सांगितलं होतं की, ती आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील नवीन घरी दिवाळी साजरी करणार आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
View this post on Instagram
यामी गौतमनं तिच्या इन्स्टाग्रामवर पती आदित्य धरसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. फोटोमध्ये यामी काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर आदित्यने काळ्या रंगाचं जॅकेट घातलं आहे. पोस्टसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, “दरवर्षी दिवाळी नवीन आठवणी आणि नवीन सुरुवात घेऊन येते. तुम्हाला व तुमच्या परिवाराला छोट्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि यशाचे जावो.” यामी आणि आदित्यचा हा क्यूट फोटो लोकांना खूप आवडत आहे.
अभिनेत्रीने खरेदी केलंय नवं घर-
यामीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, यावेळी ती मुंबईत दिवाळी साजरी करणार आहे. या मुलाखतीत तिनं असंही सांगितलं की, “मी दिवाळीबद्दल खूप उत्सुक आहे, कारण लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. ती तिचे नवीन घर दिव्यांनी सजवेल आणि पूजा करेल. तसेच या दिवाळीला मुंबईमधील नव्या घरात आदित्य आणि माझे आईवडीलसुद्धा येणार असल्याचं तिनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे या जोडप्याने नुकतंच मुंबईत नवीन घर घेतलं आहे.
अशी झाली होती आदित्य-यामीची भेट-
यामीनं तिचा पती आदित्य धर दिग्दर्शित 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटादरम्यान दोघांत जवळीकता निर्माण झाली होती. आदित्य सध्या 'द इमॉर्टल अश्वत्थामा' या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात तो पुन्हा एकदा विकी कौशलचं दिग्दर्शन करणार आहे.
(हे वाचा:'सूर्यवंशी'मध्ये महिला पोलीस साकारणारी अभिनेत्री रिअलमध्ये आहे फारच BOLD...)
यामी गौतमच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तिचा नुकताच 'भूत पोलीस' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि जॅकलीन फर्नांडिसही मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. नुकतंच यामीनं 'अ थर्सडे' आणि 'लॉस्ट' या चित्रपटांचं शूटिंग पूर्ण केलं आहे. यामी सध्या 'OMG 2' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment