अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर 'सूर्यवंशी' दोन दिवसांनी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटात अक्षय-कतरिना व्यतिरिक्त रणवीर सिंग आणि अजय देवगण देखील दिसणार आहेत. याशिवाय निहारिका रायजादा ही सुंदर अभिनेत्रीही या चित्रपटात विशेष भूमिकेत आहे. आज आपण निहारिकाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
निहारिका रायजादा अक्षय कुमारसोबत दुसऱ्यांदा काम करत आहे. सूर्यवंशीपूर्वी तिने अक्षय कुमार स्टारर बेबीमध्ये पत्रकाराची भूमिका साकारली होती. चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा अगदी लहान होती. पण 'सूर्यवंशी'मध्ये तिला पडद्यावर जास्त वेळ देण्यात आला आहे.
सूर्यवंशीमध्ये निहारिका रायजादा ताराची भूमिका साकारत आहे. अक्षय कुमारसोबत ती दहशतवादविरोधी महिला पथकाच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.
निहारिका रायजादा ही दिवंगत बॉलिवूड संगीतकार ओपी नय्यर यांची नात आहे. तिचा जन्म लक्झेंबर्गमध्ये झाला होता. आणि ती त्या ठिकाणची नागरिक आहे.
निहारिकाने इंपीरियल कॉलेज, लंडनमधून ट्रान्सलेशनल मेडिसिनमध्ये एमआरईएसचा अभ्यास केला आणि नंतर बॉल्टिमोरमधील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून कार्डिओलॉजीमध्ये संशोधन केल आहे. न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीतुन अभिनयाचे प्रशिक्षणही घेतले आहे.
निहारिका पाश्चात्य शास्त्रीय संगीत आणि बॅलेट शिकली आहे. ती 'मिस इंडिया यूके 2010' राहिली आहे. ती 'मिस इंडिया वर्ल्डवाइड 2020' ची फर्स्ट रनरअप सुद्धा होती.
2013 मध्ये तिने 'डामाडोल' या बंगाली चित्रपटातून अभिनय जगतात पाऊल ठेवल आहे. यानंतर तिने 'मसान', 'अलोन', 'बेबी', 'एक काली', 'वॉरियर सावित्री' आणि 'टोटल धमाल' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केल आहे.
निहारिका तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.