मुंबई 4 सप्टेंबर : प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस (Big Boss) विजेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) 2 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झालं. या बातमीनंतर त्याच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. काल मुंबईत त्याच्यावर अंत्य संस्कार झाले आणि सिद्धार्थने शोकाकूल वातवरणात शेवटचा निरोप घेतला. त्याच्या चाहत्यांना आणि निकटवर्तीयांना अजूनही हा धक्का पचवणं कठीण झालं आहे. अनेक सेलिब्रिंटींनी सिद्धार्थच्या जाण्याने दुःख व्यक्त केलं आहे. तर प्रसिद्ध WWE चॅम्पियन आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सिनाने (John Cena) देखील सिद्धार्थच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. जॉनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सिद्धार्थचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने सिद्धार्थच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. त्याने यासोबत कोणतही कॅप्शन लिहिलं नाही. तर सिद्धार्थचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोला अनेक बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींनीही लाईक केलं आहे.
सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीनंतर सतत त्याचे चाहते त्याच्या आठवणी शेअर करत आहेत. अनेकांनी त्यावर शोक व्यक्त केला आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही दुःख व्यक्त केलं. काल मुंबईत शोकाकूल वातावरणात सिद्धार्थला अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी त्याचे अनेक जवळचे मित्रमैत्रीणी उपस्थित होते. बिग बॉस तसेच अनेक मालिकांमधून सिद्धार्थ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शेहनाझ गिल आणि सिद्धार्थची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली होती. त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र उपस्थिती देखील लावली होती. सिद्धार्थच्या जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे.