Home /News /entertainment /

'प्रसूनजी आप सीन गलत समझ रहें है!' मुलींच्या Sexualization च्या आरोपाला स्वराचं प्रत्युत्तर

'प्रसूनजी आप सीन गलत समझ रहें है!' मुलींच्या Sexualization च्या आरोपाला स्वराचं प्रत्युत्तर

आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यामुळे प्रसिद्ध असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar)ची वेबसीरिज रसभरी (Rasbhari) देखील वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

    मुंबई, 26 जून : आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यामुळे प्रसिद्ध असणारी अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar)ची वेबसीरिज रसभरी (Rasbhari) देखील वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. रसभरी ही वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यावर मीम्स देखील बनवण्यात आले. लोकांनी या सीरिजवर बहिष्कार टाकावा अशी मागणी देखील सोशल मीडियावर अकेली आहे. स्वराने या सीरिजचा ट्रेलर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला, त्यावरही बहुतांश कमेंट्स या टीका करणाऱ्या आहेत. Amazon Prime वर रसभरी प्रदर्शित करण्यात आली आहे, त्यामुळे काहींनी अशा कमेंट्स देखील केल्या आहेत की आम्ही Amazon Prime चे सब्सक्रिप्शन देखील रद्द करत आहोत. दरम्यान रसभरीच्या प्रदर्शनानंतर आज त्यावर एक महत्त्वाची टिप्पणी आली आहे. लेखक, कवी, गीतकार प्रसुन जोशी यांनी देखील या सीरिजवर टीकेची झोड उठवली आहे. 'ही वेबसीरिज पाहून वाईट वाटले. मद्यपान करणाऱ्या पुरुषांसमोर लहान मुलीला उत्तेजक पद्धतीन नाचायला लावणे बेजबाबदार आहे. याच्या मेकर्सना आणि प्रेक्षकांना विचार करायला हवा हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की शोषण करण्याची मनमानी? मनोरंजनासाठी मुलांचा वापर करणे बंद करायला हवे'. अशा आशयाचे ट्वीट करून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रसभरी ही वेबसीरिज कोणतेही प्रमोशन न करता प्रदर्शित करण्यात आली आहे. मात्र सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान स्वराने प्रसून जोशी यांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने स्पष्टीकरण दिले आहे की, 'सर तुम्ही या सीनला चुकीचं समजला आहात. तुम्ही जसं वर्णन केलं आहात त्याच्या बरोबर विरुद्ध सीन आहे. मुलगी तिच्या मर्जीने डान्स करत आहे. हा डान्स उत्तेजक नाही आहे, तिला माहितही नाही की समाज याला सुद्धा Sexualise करेल- सीन हेच दाखवत आहे'
    First published:

    Tags: Prasoon joshi, Swara bhaskar

    पुढील बातम्या