जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'या' दिवशी होणार फरहान आणि शिबानीचं शुभमंगल, लग्नाची तारीख ठरली?

'या' दिवशी होणार फरहान आणि शिबानीचं शुभमंगल, लग्नाची तारीख ठरली?

Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding

Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लवकरच लग्नबंधनात( Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding)अडकणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 31 जानेवारी: बॉलीवूड अभिनेता आणि गायक फरहान अख्तर(Farhan Akhtar) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. फरहान आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांचं या वर्षात शुभमंगल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, दोघे फेब्रुवारी महिन्यात सात फेरे घेणार (Farhan Akhtar-Shibani Dandekar Wedding) असल्याची चर्चा देखील रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फरहान आणि शिबानी 21 फेब्रुवारीला कोर्ट मॅरेज करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरेज करणार असून एप्रिलमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. 2018 पासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्यांचा विवाहसोहळा पाहण्याची उत्सुकता लागली आहे. काही दिवसांपूर्वी, दोघेही मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सप्तपदी घेतील.अशी चर्चा रंगली होती. फरहान आणि शिबानी प्रदीर्घ काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेजण एकमेकांसोबत फिरताना, एकत्रितपणे सुट्ट्या घालवताना दिसतात. इतकेच नाही तर गेल्यावर्षी या दोघांनी दिवाळी आणि धनत्रयोदशीची पूजादेखील एकत्र केली होती. फरहान अख्तर लवकरच ‘जी ले जरा’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात