मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Tunisha Sharma Funeral : तुनिषाला अंत्यसंस्कारावेळी लाल कपडे का घालण्यात आले? हे आहे त्यामागील कारण

Tunisha Sharma Funeral : तुनिषाला अंत्यसंस्कारावेळी लाल कपडे का घालण्यात आले? हे आहे त्यामागील कारण

तुनिषा शर्मा

तुनिषा शर्मा

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यापासून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीने अवघ्या 20 व्या वर्षी हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 डिसेंबर: टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यापासून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीने अवघ्या 20 व्या वर्षी हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. तुनिषाने आत्महत्या का केली असावी याविषयी अनेकजण तर्क वितर्क लावत आहेत. पोलिसांचीही याप्रकरणी चौकशी सुरु असून रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. तुनिषावर मंगळवारी संध्याकाळी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित अनेक बडे स्टार्स उपस्थित होते. 

तुनिषावर मंगळवारी संध्याकाळी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी अभिनेत्रीला लाल कपडे घालण्यात आले होते. 20 वर्षाच्या तुनिषावर लाल कपड्यात अंत्यसंस्कार का करण्यात आले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याविषयी तुनिषाच्या काकाने आज तकशी बोलताना सांगितलं, 'तुनिषाला लाल रंग खूप आवडायचा. अंत्यसंस्कारावेळी तुनिषाला घातलेला ड्रेस तिच्या आवडीचा होता. त्यामुळे तिला लाल रंगाचा तो ड्रेस घालण्यात आला होता.'

हेही वाचा   -  Tunisha Sharma : तुनिषाच्या आयुष्यातले शेवटचे क्षण असे होते, CCTV फुटेज समोर, शिझानही दिसला

अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. मीरारोडच्या स्मशानभूमीमध्ये तुनिषाच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. तुनिषाला अखेरचा निरोप देताना कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. तुनिषाची आई तर स्मशानभूमीतच चक्कर येऊन कोसळली. तिच्या अंत्यसंस्कारावेळीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, सध्या तुनिषा शर्माच्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणात शीझान खान कचाट्यात सापडला असून त्याची चौकशी सुरु आहे. तुनिषाने यापूर्वीही आत्मत्येचा प्रयत्न केला असल्याचं शीझानने पोलिसांना सांगितलं होतं. त्याने याविषयीची माहिती तुनिषाच्या आईलाही दिली होती. दुसरीकडे तुनिषाच्या आईने शीझानवर गंभीर आरोप केले आहेत. आणि त्याला शिक्षा व्हावी अशी मागणीही केली आहे.

First published:

Tags: Entertainment, Sucide, Sucide case, Tv actress