• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • पॉर्नस्टार सनी लिओनीनं का घेतला बॉलिवूड अभिनेत्री होण्याचा निर्णय?

पॉर्नस्टार सनी लिओनीनं का घेतला बॉलिवूड अभिनेत्री होण्याचा निर्णय?

आज सनीचा वाढदिवस आहे. 40 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊया तिच्या करिअरमध्ये आलेल्या त्या वळणाविषयी...

 • Share this:
  मुंबई 13 मे: सनी लिओनी (Sunny Leone) ही बॉलिवूडमधील सर्वाधिक वादग्रस्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती सुंदर आहे, आजवर तिनं कधीही कुठलंही वादग्रस्त विधान केलेलं नाही, प्रेक्षकांमध्ये तिची क्रेझ आहे, अन् विशेष म्हणजे आपल्या चित्रपटांच्या निर्मितीचा खर्च ती स्वत: उचलू शकते तरी देखील अनेक दिग्दर्शक, कलाकार तिच्यासोबत काम करण्यास नकार देतात. (Adult Film Industry) पॉर्नस्टार असल्यामुळं बॉलिवूडनं तिला अद्याप पुर्णपणे स्विकारलेलं नाही. मग असं असतानाही इतका अपमान सहन करुन सनी बॉलिवूडमध्येच अभिनेत्री होण्याचा प्रयत्न का करतेय? (Bollywood) ती एक अत्यंत लोकप्रिय पॉर्नस्टार होती, तिला एका पॉर्नपटासाठी कोट्यवधींचं मानधन मिळत होतं पण इतकी प्रसिद्धी आणि पैसा सोडून तिनं बॉलिवूडमध्येच उर्वरीत करिअर करण्याचा निर्णय का घेतला? (Sunny Leone birthday) आज सनीचा वाढदिवस आहे. 40 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊया तिच्या करिअरमध्ये आलेल्या त्या वळणाविषयी... 2011 साली सनीनं डॅनियलसोबत लग्न केलं. तो एक पॉर्न चित्रपटांमध्ये दिग्दर्शक म्हणून काम करायचा. अशाच एका चित्रपटाच्या निमित्तानं दोघांची भेट झाली. दोघांमध्ये मैत्री झाली अन् पुढे त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर मात्र सनीच्या आयुष्यात बराचसा बदल झाला. तिच्या पतीला तिनं पॉर्नस्टार म्हणून काम करणं आवडत नव्हतं. त्यानं कधीही त्याबाबत तिला थेट सांगितलं नाही पण त्याच्या एकंदरीत हावभावातून तिला ते जाणवायचं. अखेर तिनं एकेदिवशी आपल्या प्रेमासाठी पॉर्न इंडस्ट्रीला कायमचा रामराम ठोकला व बॉलिवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. ‘कर्जाच्या ओझ्याखाली होतो आम्ही...’, आदिनाथने सांगितला सर्वांत कठीण काळाचा संघर्ष एव्हीएनला दिलेल्या मुलाखतीत सनी म्हणाली होती, तिला लहानपणापासूनच बॉलिवूडचं आकर्षण आहे. तिला एक सुप्रसिद्ध अभिनेत्री व्हायचं होतं. पण तिला ते शक्य झाली नाही त्यामुळं ती अर्धवट राहिलेली ती इच्छा आता ती पूर्ण करतेय. तिला हिंदी येत नाही म्हणून अनेक जण तिची खिल्ली उडवतात, ती पॉर्नस्टार असल्यामुळं अनेकजण तिच्यासोबत काम करण्यास नकार देतात पण सनीला याचा काहीही फरक पडत नाही. तिच्या मदते ती लहानपणापासून संघर्ष करते अन् त्याची आता सवय झाली आहे. तर अशा प्रकारे सनी लिओनीनं आपल्या पतीसाठी पॉर्न इंडस्ट्री सोडली आणि लहानपणापासूनची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती बॉलिवूडमध्ये आली.
  Published by:Mandar Gurav
  First published: