सुगंधा मिश्राला कपिल शर्मा शोमधून का केलं बाहेर?

सुगंधा मिश्राला (Sugandha Mishra) देखील निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. पण इतकी लोकप्रियता असतानाही सुगंधाला शोमधून बाहेर का काढलं?

सुगंधा मिश्राला (Sugandha Mishra) देखील निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. पण इतकी लोकप्रियता असतानाही सुगंधाला शोमधून बाहेर का काढलं?

  • Share this:
    मुंबई 23 मे: द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma show) कधीकाळी छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय विनोदी शो म्हणून ओळखळला जायचा. कपिल शर्मा, सुनील ग्रोवर, किकू शारदा, सुंगधा मिश्रा यांसारख्या दमदार कलाकारांमुळं या शोनं अल्पावधितच लोकप्रियतेच शिखर गाठलं होतं. परंतु कपिल आणि सुनीलमध्ये झालेल्या वादामुळं हा शोला उतरती कळा लागली. कपिलच्या टीमनं एक-एक करुन शो सोडण्यास सुरुवात केली. अन् चाहत्यांना सर्वात मोठा झटका बसला जेव्हा सुगंधा मिश्राला (Sugandha Mishra) देखील निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. पण इतकी लोकप्रियता असतानाही सुगंधाला शोमधून बाहेर का काढलं? लता मंगेशकर यांच्यामुळे बदललं आयुष्य! RJ सुगंधा ते मिमिक्री क्वीन असा अनोखा प्रवास सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मामध्ये अंतर्गत मतभेद सुरु होतं. अन् वाढत गेलेल्या या मतभेदांमुळं सुनीलनं शोला रामराम ठोकला. त्यानंतर या शोच्या फॉरमॅटमध्ये बराच बदल करण्यात आला. मात्र हा बदल सुगंधाला मान्य नव्हता. ती वारंवार या बाबत कपिलकडे तक्रार करत होती. मात्र तो त्यानं तिच्याकडे दुर्लक्ष केली. अखेर वैतागून सुगंधानंच शो सोडून दिला. शो सोडल्यानंतर तिनं कपिलच्या हेकेकोरीला जबाबदार धरलं होतं. ती स्वत:पुढे आपल्या सहकलाकारांना महत्व देत नाही. सतत त्यांचा अपमान करत असतो असा अरोप तिनं केला होता. त्यानंतर निर्मात्यांनी देखील एका मुलाखतीद्वारे तिनं शो सोडला नाही आम्ही तिला काढलं असा उलट दावा केला. अर्थात या वादामुळं एक मोठा प्रेक्षकवर्ग शो पासून दूर गेला. अन् कमी टीआरपीमुळं अखेर द कपिल शर्मा शो बंद करण्यात आला.
    Published by:Mandar Gurav
    First published: