जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रार्थना बेहरे का करतेय मालिकेतून पुनरागमन? सांगितलं अजब कारण

प्रार्थना बेहरे का करतेय मालिकेतून पुनरागमन? सांगितलं अजब कारण

प्रार्थना बेहरे का करतेय मालिकेतून पुनरागमन? सांगितलं अजब कारण

प्रेक्षकांना तिचा विसर पडू नये म्हणून तिने आपलं लक्ष पुन्हा एकदा मालिकेच्या दिशेने वळवलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 1 ऑगस्ट**:** प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (Prarthana Behere Movie) बोल्ड आणि हॉट फोटोशूटमुळे ती सतत चर्चेत असते. मात्र ती अभिनय करताना कधी दिसणार? हा प्रश्न तिला वारंवार केला जातो. गेली दोन वर्ष ती चित्रपटांपासून दूर आहे. मात्र तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे लवकरच ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. प्रेक्षकांना तिचा विसर पडू नये म्हणून तिने आपलं लक्ष पुन्हा एकदा मालिकेच्या दिशेने वळवलं आहे. ‘मित्र हे तुमचे खरे शत्रू असतात’; राम गोपाल वर्मांनी दिल्या ‘शत्रू दिना’च्या शुभेच्छा प्रार्थना ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazi Tuzi Reshimgathi) या मालिकेतून पुनरागमन करणार आहे. महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रार्थनाने आपल्या करिअरवर भाष्य केलं त्यावेळी तिने मालिका आणि चित्रपटांपासून दूर राहण्याचं कारण देखील सांगितलं. ती म्हणाली, “मला गेली अनेक वर्ष खूप मालिकांच्या ऑफर आल्या. परंतु, तेव्हा मी फक्त चित्रपट करायचं ठरवलं होतं. मी जाणूनबुजून मालिकांना नकार देत गेले. परंतु गेली दोन वर्ष मी चित्रपटांमध्ये देखील झळकलेले नाही. त्यामुळे सतत मला चित्रपटात कधी झळकणार असा प्रश्न विचारला जात होता. त्यामुळे मला एक कळलं की प्रेक्षकांना मला पाहायचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर मी मालिकेद्वारे पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला.” Big Boss15 OTT: अनुषा दांडेकर ते अक्षरा सिंग हे कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात; पाहा कोण कोण आहेत यापुढे ती म्हणाली, “जेव्हा तुम्ही सगळ्यांच्या दृष्टीआड होता तेव्हा तुम्ही इतरांच्या डोक्यातूनही निघून जाता. तुम्ही काय करता याचा कोणाला फारसा फरक पडत नाही. त्यामुळे इथे तुम्हाला तुमच्या असण्याची समोरच्याला जाणीव करून द्यावी लागते. मी प्रेक्षकांच्या विस्मरणात जाऊ नये म्हणून मी मालिका करण्याचा निर्णय घेतला.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात