जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / होकार देऊनही ऐनवेळी किशोरदा गाऊ शकले नाहीत गाणं; अपुरं राहिलं अनु मलिक यांचं स्वप्न

होकार देऊनही ऐनवेळी किशोरदा गाऊ शकले नाहीत गाणं; अपुरं राहिलं अनु मलिक यांचं स्वप्न

होकार देऊनही ऐनवेळी किशोरदा गाऊ शकले नाहीत गाणं; अपुरं राहिलं अनु मलिक यांचं स्वप्न

किशोरदांनी त्यांना गाण्यासाठी होकार देखील दिला होता. तरी देखील त्यांना किशोरदांसोबत काम करता आलं नाही. इंडियन आयडलच्या मंचावर अनु मलिक यांनी तो भावूक करणारा किस्सा सांगितला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 8 मे**:** किशोर कुमार (Kishore Kumar) हे भारतीय संगीतसृष्टीतील आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय गायकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांच्या माध्यमातून तब्बल तीन दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 70-80च्या दशकातील प्रत्येक संगीतकार त्यांच्यासोबत काम करण्यासाठी धडपड करायचा. अशीच धडपड अनु मलिका (Anu Malik) यांनी देखील केली होती. किशोरदांनी त्यांना गाण्यासाठी होकार देखील दिला होता. तरी देखील त्यांना किशोरदांसोबत काम करता आलं नाही. इंडियन आयडलच्या मंचावर अनु मलिक यांनी तो भावूक करणारा किस्सा सांगितला. 1987 साली अनु मलिक दांव पेंच या चित्रपटासाठी गाणी तयार करत होते. या चित्रपटातील किमान एक तरी गाणं किशोरदांनी गावं अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांचं मानधन जास्त असल्यामुळं निर्माते त्यासाठी तयार नव्हते. अखेर भरपुर विनंती केल्यानंतर निर्मात्यांनी होकार दिला. या गाण्यासाठी सुरुवातीला किशोरदांना 10 हापुस मिळणार होते परंतु अखेर 15 हापुसवर त्यांनी काम करण्याची तयारी दर्शवली. हापुस म्हणजे पैसे. किशोरदा नेहमी कोडवर्डमध्ये पैसे मागायचे. ते पैशांना हापुस म्हणायचे. ‘…तर डोळे बंद करा’; बिकिनी फोटोद्वारे कश्मिरानं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

जाहिरात

अखेर रेकॉर्डिंगची तयारी झाली. अनु मलिक यांनी याबाबत किशोरदांना फोन करुन माहिती देखील दिली. परंतु त्याच रात्री त्यांचं निधन झालं. त्यामुळं अनु मलिक यांचं त्यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न कायमचं अपुर्ण राहिलं. हा किस्सा सांगताना त्यांना अक्षरश: रडू कोसळलं होतं. इंडियन आयडलच्या मंचावर किशोरदांचे पुत्र अमित कुमार यांनी हजेरी लावली होती. त्यानिमित्तानं त्यांनी हा भावुक करणारा किस्सा सांगितला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात