Home /News /entertainment /

 ‘...तर डोळे बंद करा’; बिकिनी फोटोद्वारे कश्मिरानं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

 ‘...तर डोळे बंद करा’; बिकिनी फोटोद्वारे कश्मिरानं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

या फोटोंमुळं अनेकांनी तिची खिल्ली उडवली होती. बूढ़ी घोड़ी लाल लगाम सारख्या कॉमेंट्स ट्रोलर्सनं तिच्यावर केल्या होत्या. मात्र या ट्रोलर्सला कश्मिरानं देखील त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे.

  मुंबई 8 मे: बॉलिवूड अभिनेत्री कश्मिरा शाह (Kashmera Shah) गेल्या काही काळात आपल्या बोल्ड लूकमुळं सतत चर्चेत राहू लागली आहे. कश्मिरानं आता चाळीशी पार केली आहे. त्यामुळं व्हायरल होणाऱ्या या फोटोंमुळं अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार यावेळीसही घडला होता. कश्मिरानं एक बोल्ड फोटोशूट केलं होतं. (Kashmera Shah share bikini photo) या फोटोंमुळं अनेकांनी तिची खिल्ली उडवली होती. बूढ़ी घोड़ी लाल लगाम सारख्या कॉमेंट्स ट्रोलर्सनं तिच्यावर केल्या होत्या. मात्र या ट्रोलर्सला कश्मिरानं देखील त्यांच्याच शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. कश्मिरानं इन्स्टाग्रामवर आणखी काही बिकिनी परिधान केलेले फोटो शेअर केले आहेत. अन् या फोटोंद्वारे तिनं पुन्हा एकदा ट्रोलर्सचा डिवचण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे तिच्या चाहत्यांनी फोटोंपेक्षा त्यावरील कॉमेंट्सवर कौतुकाचा अधिक वर्षाव केलाय. “लोक माझ्यावर जळतात मला माहिती आहे. पण त्यांच्या निगेटिव्ह कॉमेंट्स आता मी पॉझिटिव्हली घेण्यास सुरुवात केली आहे. यापुढे मी सामान्य अशी कुठलीचं गोष्ट करणार नाही. ज्यांना त्रास होत असेल त्यांनी स्वत:चे डोळे बंद करुन घ्यावेत.” अशा आशयाचा टोला तिनं आपल्या ट्रोलर्सला लगावला आहे. बालपणीच्या आठवणी होणार ताज्या; अमेय वाघ पुन्हा होतोय फास्टर फेणे
  View this post on Instagram

  A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

  कश्मिरा ही प्रसिद्ध विनोदी अभिनेता कृष्णा अभिषेक याची पत्नी आहे. 2013 साली दोघांनी लग्न केलं होतं. कृष्णाला तिचा मादकपणा प्रचंड आवडला होता. त्यामुळं आपल्या पतीला सतत खुश ठेवण्यासाठी ती असे बोल्ड फोटोशूट करत असते असं कश्मिरा म्हणाली होती. कश्मिराला आज दोन मुलं आहेत. तिनं आपली चाळीशी पार केली आहे. तरी देखील योग्य व्यायम, योगा आणि पोषक आहाराच्या जोरावर तिनं आपली सुदृढता टिकवून ठेवली आहे. किंबहूना दिवसेंदिवस ती आणखी सुंदर होत चालली आहे अशी कॉमेंट तिचा पती वारंवार तिच्या फोटोंवर करताना दिसतो. दरम्यान तिनं यावेळेसही केलेलं फोटोशूट चर्चेत आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Bollywood actress, Entertainment, Marathi actress

  पुढील बातम्या