• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • "इरफान खानने माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला कारण...", कंगणा रणौतने केला मोठा खुलासा

"इरफान खानने माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला कारण...", कंगणा रणौतने केला मोठा खुलासा

अभिनेता इरफान खानने (Irrfan Khan) कंगना रणौतसोबत (Kangana Ranaut) काम करण्यास नकार देताच ती म्हणाली...

  • Share this:
मुंबई, 27 एप्रिल : हिंदी चित्रपटसृष्टीतील झाशीची राणी, क्वीन आणि आपल्या फटकळ बोलण्यामुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रणौत (Kangana ranaut) कायम वादात आणि चर्चेत असते. अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींबाबत ती वादग्रस्त विधानं करते. बहुतेक सेलिब्रिटी तर तिच्यासोबत काम करण्यास नकारही देतात. असाच नकार अभिनेता इरफान खाननेही (Irrfan khan) दिला होता. कंगना रणौतने स्वतः याबाबत खुलासा केला होता. कंगनाचा तनु वेड्स मनू रिटर्न्स हा चित्रपट प्रचंड गाजला होता. तेव्हा कंगना इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करू पाहत होती.  त्यानंतर तिची एक मुलाखत जाली. त्यावेळी अभिनेते इरफान खान यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याबाबत तिला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने एक मोठा खुलासा केला होता. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार कंगना म्हणाली, ‘मी त्यांना म्हणाले होते आपण चित्रपटाचं काम सुरू करूया. तर ते म्हणाले, करूया पण एका म्यानात दोन तलवारी कशा काय राहणार?" हे वाचा - सैफ-करिनाच्या लग्नात खूश नव्हत्या शर्मिला टागोर, हे होतं कारण इरफान यांची ही प्रतिक्रिया मी ती काँप्लिमेंट म्हणून घेतली. इरफान सरांसारख्या कुणीतरी माझ्यासोबत काम करावं अशी माझी इच्छा होती. मला कडवट स्पर्धा देणारा अभिनेता. मी त्यांच्याशी स्पर्धा करू शकेन अशी अभिनेत्री आहे असं त्यांना वाटत होतं ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. त्यांच्या या काँप्लिमेंटनंतर मला खूपच आनंद झाला होता, असं कंगना म्हणाली. कंगनाला असाही प्रश्न विचारला होता की अभिनेते तिच्यासोबत स्क्रीन शेअर करायला घाबरतात का? त्यावर ती म्हणाली, ‘हो ते मला तोंडावर सांगतात की आम्हाला तुझ्यासोबत काम करायला भीती वाटते. लोकांना वाटतं की मी एखाद्या चित्रपटासाठी होकार दिला तर त्यातला माझा रोल अधिक चांगल्या पद्धतीने लिहिला जाईल.’ हे वाचा - देशातील कोरोना स्थितीदरम्यान प्रियांका चोप्रानं मागितली अमेरिकेकडे मदत दिवंगत अभिनेत्री मधुबाला यांच्यासोबत काम करायला खूप आवडलं असतं. त्या खूपच सुंदर आणि निरागस होत्या. त्यांचा वावरच जादुई होता त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायला फार मजा आली असती, असंही कंगनानी सांगितलं.
First published: