मुंबई 24 जून: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. अनेकदा यामुळं तिला ट्रोल देखील केलं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. (Kangana Ranaut upcoming movie) यावेळी कंगनानं चेहऱ्यावर रंग लावतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून या बाईचं चाललं तरी काय आहे? असा सवाल काही नेटकरी करत आहेत.
कंगना लवकर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या भूमिकेत झळकणार आहे. ती इंदिरा गांधी यांच्या बायोपिकपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. इन्स्टाग्रामद्वारे तिनं या आगामी चित्रपटाची घोषणा केली. परंतु सोबतच तिनं काही फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर प्लास्टिक लावून निळा रंग लावताना दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून ही बाई आपल्या चेहऱ्यावर रंग का लावतेय? असा सवाल काही नेटकरी करत आहेत. काही जणांनी यावरुन तिची खिल्ली देखील उडवली आहे. कंगनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
...म्हणून सुमोना चक्रवर्ती कपिल शर्माला घालायाची शिव्या; केला धक्कादायक खुलासा
View this post on Instagram
कॅटरिना कैफ पेक्षा जास्त सुंदर आहे तिची धाकटी बहीण इसाबेल, नव्या PHOTO शूटनी चर्चा वाढली
कंगनाचे चाहते सध्या तिच्या ‘थलाईवी’ या चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनचं चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. कंगनाच्या या चित्रपटाला एक दिवसापूर्वीचं सेन्सॉर बोर्डकडून ‘यू’ सर्टिफिकेट मिळालं आहे. कंगनाचा हा चित्रपट 23 एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Indira gandhi, Kangana ranaut, Movie release