मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन / ‘बॉलिवूड हा केवळ ग्लॅमरचा भ्रम’; इलाक्षीनं सांगितलं मराठीत पदार्पण करण्याचं खरं कारण

 ‘बॉलिवूड हा केवळ ग्लॅमरचा भ्रम’; इलाक्षीनं सांगितलं मराठीत पदार्पण करण्याचं खरं कारण

मराठी चित्रपटांच्या तुलनेत बॉलिवूडमध्ये अधिक पैसे आणि प्रसिद्धी मिळते. परंतु चाहत्यांच्या या प्रश्नावर आता स्वत: इलाक्षीनं उत्तर दिलं आहे.

मराठी चित्रपटांच्या तुलनेत बॉलिवूडमध्ये अधिक पैसे आणि प्रसिद्धी मिळते. परंतु चाहत्यांच्या या प्रश्नावर आता स्वत: इलाक्षीनं उत्तर दिलं आहे.

मराठी चित्रपटांच्या तुलनेत बॉलिवूडमध्ये अधिक पैसे आणि प्रसिद्धी मिळते. परंतु चाहत्यांच्या या प्रश्नावर आता स्वत: इलाक्षीनं उत्तर दिलं आहे.

मुंबई 17 जुलै: ‘तान्हाजी’ (Tanhaji) या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी इलाक्षी गुप्ता (Elakshi Gupta) लवकरच मराठी सिनेसृष्टीतही डेब्यु करणार आहे. अलिकडेच ‘भ्रम’ (Bhram) या चित्रपटाचं पोस्टर शेअर करून तिने ही नवी घोषणा केली. तान्हाजीमुळे इलाक्षी रातोरात प्रकाशझोतात आली होती. तिच्याकडे अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर देखील होत्या. परंतु या सर्व ऑफर धुडकावत तिने मराठी सिनेसृष्टीचा रस्ता निवडला. (Marathi Movie) तिच्या या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केलं. कारण मराठी चित्रपटांच्या तुलनेत बॉलिवूडमध्ये अधिक पैसे आणि प्रसिद्धी मिळते. परंतु चाहत्यांच्या या प्रश्नावर आता स्वत: इलाक्षीनं उत्तर दिलं आहे.

लिहिण्यासाठी काहीच नाही म्हणणारे बिग बी का झाले ट्रोल?

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत इलाक्षीनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिने हिंदी सोडून मराठीत येण्याचं कारण सांगितलं. ती म्हणाली, “अभिनय करणं ही माझी आवड आहे. प्रसिद्धी, फॅन फॉलोइंग, अफाट पैसा मिळवण्यासाठी वगैरे मी या क्षेत्रात आलेली नाही. मला दर्जेदार काम करायचं आहे. चांगल्या भूमिका साकारायच्या आहेत. अभिनयामुळे मी लोकांच्या स्मरणात राहावी अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी मराठी सिनेसृष्टीचा रस्ता निवडला. इथे ग्लॅमराइज दिसण्यापेक्षा चित्रपटाच्या पटकथेला अधिक महत्व दिलं जातं. अभिनेत्रीना ठाम अशा भूमिका दिल्या जातात. त्या बॉलिवूडप्रमाणे केवळ हिंरोंच्या मागे उभ्या राहात नाही. त्यामळे काहीतरी दर्जेदार काम करता यावं यासाठी मराठीकडे वळले.”

'Trolling हा मनोविकार आणि ...!' मृण्मयी देशपांडेने टीकेवर सोडलं मौन

इलाक्षीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. या फोटोंना कॅप्शन देत तिने ‘भ्रम’ चित्रपटाचं शुटींग सुरु असल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटामध्ये ती अभी आमकरसोबत दिसून येणार आहे. हा एक रहस्यमयी चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन वैभव लोंढे यांनी केलं आहे. तान्हाजी या हिंदी चित्रपटानंतर इलाक्षी मराठीमध्येसुद्धा आपला ठसा उमठवण्यासाठी सज्ज झाली आहे.

 

First published:
top videos

    Tags: Bold photoshoot, Marathi actress, Movie shooting