कोण आहे श्रुती मोदी? सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने हिच्याही विरोधात दाखल केला गुन्हा

कोण आहे श्रुती मोदी? सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI ने हिच्याही विरोधात दाखल केला गुन्हा

CBI ने दाखल केलेल्या आरोपपत्रात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह सहा जणांविरुद्ध केस दाखल केली आहे. त्यामध्ये एक नाव आहे श्रुती मोदी.

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant singh rajput suicide case) प्रकरणाचा तपास आता CBI कडे गेला आहे. CBI ने दाखल केलेल्या आरोपपत्रात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह (rhea chakraborty) सहा जणांविरुद्ध केस दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये एक नाव आहे श्रुती मोदी. त्यामुळे ही श्रुती मोदी नेमकी कोण (shruti modi) आणि संशयाची सुई हिच्यापर्यंत कशी पोहोचली याविषयी उत्सुकता आहे.

सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती या रियाच्या कुटुंबीयांबरोबर सॅम्युएल मिरांडा आणि श्रुती मोदी अशी दोन नावं आहेत. सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांबरोबर आणखी एक नाव घेतले होतं, ते म्हणजे - श्रुती मोदी.

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी आधीच 35 हून अधिक जणांचे जबाब नोंदवले होते. नंतर पाटणा पोलिसांनी देखील अनेकांचे जबाब नोंदवले. सुशांतचे वडील केके सिंह यांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण मिळालं.

कोण आहे श्रुती मोदी?

सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांबरोबर श्रुती मोदी हे देखील नाव आहे. यानंतर श्रुती मोदीचे सुशांतच्या मृत्यूशी काय कनेक्शन आहे, असे सवाल उपस्थित झाले होते. दरम्यान अशी माहिती समोर येत आहे की, श्रुती मोदी या महिलेने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीची मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे.

सुशांतच्या कंपनीमध्ये रिया-शोविकचे सर्व काम श्रुती पाहायची. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी याआधी श्रुतीची चौकशी केली आहे. आता पाटणा पोलीस देखील तिच्या पत्त्यावर जाऊन श्रुतीची चौकशी करू शकतात. यामुळे सुशांतच्या मृत्यू प्रकरणात काहीतरी धागेदोरे सापडतील अशी अपेक्षा पोलिसांना आहे.

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती हिला ईडीने चौकशी कडक केली आहे. ईडीने या प्रकरणात मनी ट्रेलच्या तपासात गुंतली आहे. ईडीने सूत्रांकडून माहिती मिळवली आहे की गेल्या काही वर्षात रियाची नेट कमाई 10 लाख ते 12 लाख आणि नंतर 14 लाखांपर्यंत पोहोचली आहे. ईडीच्या सूत्रांनी इन्कम टॅक्स रिटर्नच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

अत्यंत कमी उत्पन्न असतानाही रिया चक्रवर्तीने मुंबईत 2 प्रॉपर्टी खरेदी केली आहे. यामध्ये एक रिया आणि दुसरी प्रॉपर्टी तिच्या कुटुंबीयांच्या नावावर आहे. रियाने या दोन्ही प्रॉपर्टीसाठी कुठून पैसे दिले त्याबाबत अद्याप माहिती समोर आली आहे. काहीतरी गोंधळ असल्याचे लक्षात आल्यावर ईडीने या प्रॉपर्टीचे कागदपत्र मागितले आहेत. गुरुवारपर्यंत याबाबत कागदपत्र मिळण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात सुशांत सिंह राजपूतच्या 2 कंपन्यांचा तपास करण्यात आला आहे. एक कंपनी दिल्लीत आहे त्याचा तपास होण अद्याप बाकी आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने सुशांत सिंह याचा सीएशी याबाबत चौकशी केली. मात्र सीएच्या उत्तरामुळे ईडी समाधानी झाली नाही. प्रॉपर्टीशी संबंधित चौकशीसाठी ईडीने रिया चक्रवर्तीला इमेल पाठवला आहे. अद्याप यावर प्रत्युत्तर आलेलं नाही.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: August 7, 2020, 7:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading