मुंबई, 26 ऑगस्ट : झी मराठीच्या मंचावर नेहमीच सादर होणाऱ्या कार्यक्रमांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. यावर्षीही झी मराठीनं स्त्री कर्तृत्वाचा सन्मान म्हणून ‘उंच माझा झोका’ हा पुरस्कार सोहळा आयोजीत केला आहे. ‘उंच माझा झोका’ पुरस्काराचं यंदाचं हे आठवं वर्ष असून हा नेत्रदीपक सोहळा 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच या पुरस्कारादरम्यानचा एक छोटासा व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. झी मराठी वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ‘उंच माझा झोका’ कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिनेत्रींना प्रश्न विचारण्यात आला आहे. तुम्हाला काय वाटतं एका स्त्रीची सर्वात जवळची मैत्रीण कोण असते ?, या प्रश्नाचं उत्तर देताना काही अभिनेत्री दिसत आहे. अनेकांनी म्हटलं की स्त्रीची सर्वात जवळची मैत्रिण ही स्त्री स्वतःच असते. कारण स्वतःवर प्रेम करायला शिकलं की, लोक आपल्यावर प्रेम करतात. तर काहींनी म्हटलं की, जेव्हा प्रत्येक स्त्री दुसऱ्या स्त्रीची चांगली मैत्रिण होईल तेव्हा ती सगळं जिंकेल. यातच अभिनेत्री धनक्षी काडगावकरने म्हटलं की कॉन्फिडंस हा स्त्रीची चांगली आणि पक्की मैत्रिण असू शकतो. हेही वाचा - Sidhu Moosewala: सिद्धू मुसेवालाच्या वडिलांची पोलिसांत धाव; इंडस्ट्रीतील 2 लोकांविरुद्ध तक्रार दाखल अभिनेत्री मृण्मयी देशपांडे म्हणाली की, ‘शांतता हा स्त्रीची चांगली मैत्रिण आहे. कारण त्या शांततेसाठी बाई कायम आसुसलेली असते आणि कित्येक गोष्टींवरती घरातली दिवसभरातील सगळीक कामं मार्गी लागली की, पाच-दहा मिनिटे जे तिला मिळतात त्यामधे ती ती तिचा कुटुंबाचा विचार करते. त्यामुळे क्वचित मिळणारी जी शांतात असते ती खरी स्त्रीची मैत्रिण असते’. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलंच लक्ष वेधत असून व्हिडीओवर अनेक लाईक्स आणि कमेंट येत आहे.
दरम्यान, आपल्या कार्याने समाजाला सुदृढ वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव ‘उंच माझा झोका’ कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा पंकजा मुंडे आणि क्रांती रेडकर सांभाळणार आहेत.