मुंबई, 26 ऑगस्ट- पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येबाबत सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धूच्या वडिलांनी संगीत क्षेत्राशी संबंधित दोन लोकांविरोधात डीजीपीकडे तक्रार केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांची नावे घेतली आहेत. हे दोघेही पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये खूप लोकप्रिय व्यक्ती आहेत. त्यांच्याकडे सिद्धू मूसेवालाची 50 हून अधिक गाणी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आता या दोघांवरही कारवाई करण्याची तयारी करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धूच्या वडिलांनी ज्यादिवशी 1 आठवड्याचा अल्टिमेटम दिला आहे. त्यादिवसापासून मानसाचे एसएसपी तसेच वरिष्ठ अधिकारी सिद्धूच्या वडिलांच्या संपर्कात आहेत आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये संगीतक्षेत्रातील दोन मोठ्या व्यक्तींची नावे समोर आली आहेत. नवज्योतसिंग पंढेर आणि कंवर ग्रेवाल अशी ही नावे आहेत.. मूसेवाला प्रकरणात लवकरच न्यायालयात चलन सादर करण्यात येणार आहे. डीजीपी पंजाब यांनी स्वत: बलकार सिंह यांच्याशी याप्रकरणी चर्चा केली होती. यापूर्वी सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर रिलीज झालेलं ‘SYL’ हे गाणं यूट्यूबने काढून टाकलं होतं. आणि त्यानंतर पंजाबी गायक कंवर ग्रेवालचं ‘रिहाई’ हे गाणंही काढून टाकण्यात आलं होतं. **(हे वाचा:** Sidhu Moosewala च्या चाहत्यांसाठी खूशखबर; सिद्धूचं नवं गाणं ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित ) सिद्धू मुसेवाला हत्या- 29 मे रोजी पंजाबमधील मानसा येथे सिद्धू मुसेवाला यांची काही लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. सिद्धू मुसेवाला हे उत्कृष्ट पंजाबी गायक होते. 2017 मध्ये G Wagon या गाण्याद्वारे त्यांनी गायनात पदार्पण केलं होतं. त्यांच्या अल्बमद्वारे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.