मुंबई 08 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालननं (Vidya Balan) आपल्या करिअरमध्ये अनेक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. यातच ‘द डर्टी पिक्चर’मधील सिल्क स्मिताची भूमिकाही सामील आहे. या सिनेमासाठी विद्या बालननं भरपूर वजन (Vidya Balan Weight) वाढवलं होतं. यानंतर तिचं वाढलेलं वजन चर्चेचा विषय ठरला होता. अनेकदा तिच्या या वाढलेल्या वजनामुळे तिला ट्रोलही केलं गेलं. मात्र, अभिनेत्रीनं या सर्व गोष्टींवर कधीच काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, आता अभिनेत्रीनं आपल्या वजानबाबत मोकळेपणानं बातचीत केली आहे. विद्या बालननं सांगितलं, की एक काळ असा होता, जेव्हा ती स्वतःच आपल्या शरीराचा तिरस्कार करायची,कारण ती हे मान्य करू शकत नव्हती. अभिनेत्रीनं सांगितलं, की एक काळ असा होता जेव्हा ती स्वतःच्या शरीराचा तिरस्कार करत होती. कारण तिचं वाढलेलं वजन राष्ट्रीय मुद्दा ठरला होता. यानंतर हळूहळू ती या समस्येतून बाहेर येऊ लागली. एका मुलाखतीत तिनं म्हटलं, की आता तिला या गोष्टींचा फरक पडत नाही, की लोक आपल्या केसांची लांबी, मोठे हात किंवा उंचीबद्दल काय बोलतात. अभिनेत्री म्हणाली, की माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे, की मी कोणत्या परिस्थितीमधून गेले आणि मी काय केलं. हे सगळं सार्वजनिक आणि अपमानास्पद होतं. माझी पार्श्वभूमीवर चित्रपटसृष्टीतील नाही, किंवा कुटुंबातील इतर कोणी या क्षेत्रात नव्हतं. त्यामुळे मला हे सांगणारं कोणीच नव्हतं, की कोणतीच गोष्ट शेवट नसते. माझं वजन राष्ट्रीय मुद्दा ठरला होती. मी नेहमीच एक मोठी किंवा वजन जास्त असणारी मुलगी होते. मी असं म्हणणार नाही, की माझं वाढतं वजन मला त्रास देत नाही. मात्र,यामुळे मला बरच काही सहन करावं लागलं, असंही अभिनेत्री म्हणाली. पुढे विद्या बालननं सांगितलं, की मला सुरुवातीपासूनच हार्मोन्ससंबंधीच्या अडचणी आहेत. बऱ्याच काळापर्यंत मला स्वतःच्या शरीराचाच राग यायचा. मला असं वाटायचं, की माझ्या शरीरानं माझ्यासोबत दगा केला. ज्या दिवसांमध्ये मी सर्वात चांगलं दिसण्याच्या दबावात होते, तेव्हाच माझी तब्येत वाढत होती. हे पाहून मी नैराश्यात जात होते. मात्र, कालांतरानं मी ही गोष्ट मान्य केली पण यासाठी मला बराच वेळ लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.