सुशांतनं घालून दिली होती अंकिता आणि झिवा धोनीची भेट, पाहा PHOTOS

सुशांतनं घालून दिली होती अंकिता आणि झिवा धोनीची भेट, पाहा PHOTOS

सुशांत सिंह राजपूतनं 'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' सिनेमासाठी खूप मेहनत घेतली होती. त्यावेळी त्यानं बराच काळ धोनी आणि त्याच्या फॅमिलीसोबत घालवला होता.

  • Share this:

मुंबई, 23 जून : सुशांत सिंह राजपूतचा 'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. या सिनेमासाठी सुशांतनं खूप मेहनत घेतली होती. धोनीच्या वागण्या-बोलण्यातले, खेळण्यातले बारकावे टिपण्यासाठी त्यानं बराच काळ धोनी आणि त्याच्या फॅमिलीसोबत घालवला होता. एवढंच नाही तर त्यावेळी त्यानं अंकिताला धोनीची मुलगी झिवाला भेटवण्यासाठी त्याच्या घरी सुद्धा घेऊन गेला होता. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

सुशांत जेव्हा धोनीच्या बायोपिकचं शूटिंग करत होता त्यावेळी तो आणि अंकिता रिलेशनशिपमध्ये होते. या सिनेमाच्या रिलीजनंतर हे दोघं वेगळे झाले. पण सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अंकिता सुशांतसोबत धोनीच्या घरी झिवाला भेटण्यासाठी गेली होती. या वेळी सर्वांनी खूप धम्माल केली होती. त्यावेळचे या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत.

सुशांतच्या निधनानंतर अंकिताला मोठा धक्का बसला आहे. अंकिता सुशांतवर जेवढं प्रेम करायची तेवढा त्याचा सन्मान सुद्धा करत असे. ती सुशांतच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेली होती. त्यांच्या एका कॉमन फ्रेंड संदीपनं सुशांतच्या आठवणींना उजाळा देत एक पोस्ट लिहिली होती. ज्यात त्यानं अंकितानं अद्याप तिच्या घराच्या नेमप्लेटवरून सुशांतचं नाव हटवलं नसल्याचं सांगितलं होतं.

संदीपनं त्याच्या लिहिलं, 'ती केवळ तुच होतीस जी सुशांतच्या चेहऱ्यावर हसू आणू शकत होती. एवढंच नाही तर मला आजही वाटतं, की तुम्ही दोघंही एकमेकांसाठी बनलेले होता. तुम्ही दोघं सर्वासाठी खऱ्या प्रेमाचं उदाहरण होता. हे सर्व आठवल्यावर मला रडू येत आहे. मी त्याला आता कसं परत आणू, मला त्याला परत आणायचं आहे. तुला मालपुवा आठवतो का? सुशांत कसा एखाद्या लहान मुलाप्रमाणे माझ्या आईकडे मटण करी मागत असे. मला माहित आहे फक्त ती तुच होतीस जी त्याला वाचवू शकत होती.'

First published: June 23, 2020, 2:13 PM IST

ताज्या बातम्या