मुंबई, 3 जून : पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ अखेर महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हे वादळ धडकले आहे. वादळामुळे मुंबईसह उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. पुढील सहा तास या वादळाचा प्रभाव कायम राहणार आहे. दरम्यान मराठी कलाकारांनी मुंबईकरांना या वादळच्या काळात घरी राहूनच स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे… अभिनेता भारत गणेशपुरे यांनी मुंबईकरांना काय आवाहन केलंय पाहा
चक्रीवादळ आलं... अभिनेता भारत गणेशपुरे यांनी मुंबईकरांना काय आवाहन केलंय पाहा pic.twitter.com/v4yh2fkSxl
— News18Lokmat (@News18lokmat) June 3, 2020
मराठी आणि हिंदी सिनेमातून प्रेक्षकांवर आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणारे अभिनेता मकरंद देशपांडे यांनी देखील मुंबईकरांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे
बिग बॉस मराठीच्या 2 पर्वात फिनाले गाठणारा अभिनेता आरोह वेलणकरनं मुंबईकरांना आणि कोळी बांधवाना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
चक्रीवादळ आलं... अभिनेता आरोह वेलणकरनं मुंबईकरांना काय आवाहन केलंय पाहा... pic.twitter.com/82XrEeWHAn
— News18Lokmat (@News18lokmat) June 3, 2020
आज दुपारी रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग जवळून ताशी 100-110 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह निसर्ग चक्रीवादळ अखेर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकले आहे. उत्तर पूर्व अरबी समुद्र आणि दक्षिण गुजरात किनाऱ्यावर समुद्र खवळलेला असून 1 ते 2 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.