मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /गर्लफ्रेंडचा रूसवा काढण्यासाठी खिलाडी कुमार करायचं 'हे' काम ; शिल्पा शेट्टी अक्षय कुमारसोबतच्या नात्यावर स्पष्टच बोलली

गर्लफ्रेंडचा रूसवा काढण्यासाठी खिलाडी कुमार करायचं 'हे' काम ; शिल्पा शेट्टी अक्षय कुमारसोबतच्या नात्यावर स्पष्टच बोलली

shilpa shetty and akshay kumar

shilpa shetty and akshay kumar

शिल्पा एकेकाळी अक्षय कुमारसोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत होती. या दोघांनी एकमेकांना बराच काळ डेट केलं, पण नंतर दोघांचं ब्रेकअप झालं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 मार्च- शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पा तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. 47 व्या वयातही शिल्पाचा बॉलिवूडमध्ये दबदबा कायम आहे. अभिनेत्रीचे आजही लाखो चाहते आहेत. आपल्या जबरदस्त फिटनेस आणि सौंदर्यामुळे शिल्पा एकेकाळी इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक होती, जिची इंडस्ट्रीत सर्वात जास्त डिमांड होती. आपल्या चित्रपटांसोबतच शिल्पा एकेकाळी अक्षय कुमारसोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत होती. या दोघांनी एकमेकांना बराच काळ डेट केलं, पण नंतर दोघांचं ब्रेकअप झालं.

शिल्पा शेट्टीनं स्व:ता अक्षय कुमारसोबतच्या ब्रेकअप झाल्याचं कारण सांगितलं होतं. एककाळ असा होता की, शिल्पा अक्षयसाठी वाटेल ते करायला तयार होती. एवढचं नाही तर ती त्याच्यावर जीव ओवाळून टाकत होती. पण जेव्हा तिला समजलं की, अक्षय तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना दुसऱ्या एका मुलीला देखील डेट करत आहे तेव्हा ती खूप दुखावली होती. तेव्हा तिनं ब्रेकअप करत आपला मार्ग वेगळा केला. शिल्पानं 2000 साली फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता.

वाचा-एकेकाळी गाजलेल्या नायिका आज बिनकामी काढतायत दिवस; वाईट झालीये अवस्था

या मुलाखतीत शिल्पा पहिल्यांदाच तिच्या आणि अक्षयमधी असलेल्या नात्यावर जाहीरपणे बोलली. ती म्हणाली अक्षय एकावेळेस दोन मुलींना डेट करत होता. तिच्यासोबत तो ट्विंकल खन्नाला देखील डेट करत होता. मला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा मला खूप वाईट वाटलं. पण कसबस मी यातून मला सावरलं. तिनं या मुलाखतीत सांगितलं होतं की, अक्षयनं अशाप्रकारे डिच केल्यामुळं मला खूप त्रासा झाला होता. यातून बाहेर पडणं माझ्यासाठी अवघड झालं होतं.

शिल्पा म्हणाली की, तो काळ माझ्यासाठी खूप त्रासदायक असा होता. आता मी आनंदी आहे की, या सगळ्यातून बाहेर आले. असं म्हणतात ना, एका काळ रात्रीनंतर एक आशेची सकाळ येते. माझ्या आयुष्यात देखील तसच काहीसं घडलं आहे. मी माझ्या पर्सनल आय़ुष्यात खूप चढउतार पाहिले आहेत. पण, आता सारं काही ठीक आहे, मी यातून बाहेर पडले आहे.

यावेळी शिल्पानं अक्षयचा आणखी एक किस्सा सांगितला होता. तो म्हणजे अक्षय त्याच्या रूसलेल्या गर्लफ्रेंडची समजूत काढण्यासाठी तिला मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात घेऊन जात असे आणि तिला तिथं लग्नाचे वचन द्यायचा. पण, त्याच्या आयुष्यात एखाद्यी नवीन मुलगी येताच तो आपल्या वचनापासून मागे हटायचा हेही तितकच खरं असल्याचं सांगत तिनं अक्षयची सर्वांसमोर पोलखोल केली होती.

शिल्पा शेट्टीनं आता राज कुंद्रासोबत लग्न केलं आहे. तिला राजपासून दोन मुलं आहेत. ती तिच्या आयुष्यात सुखी आहे. तर अक्षयनं देखील ट्विंकल खन्नासोबत लग्न केलं आहे. अक्षयला देखील दोन मुलं आहेत. य़ा दोघांचा देखील सध्या सुखाचा संसार सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment