मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'जे सुशांत सिंग राजपूतसोबत घडलं, तेच आता माझ्यासोबत....',KRK चा धक्कादायक दावा

'जे सुशांत सिंग राजपूतसोबत घडलं, तेच आता माझ्यासोबत....',KRK चा धक्कादायक दावा

कमाल आर खान

कमाल आर खान

सोशल मीडियावर वादग्रस्त विधानांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधणारा कमाल आर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नेहमीप्रमाणे केआरकेनं वादग्रस्त ट्विट करत सगळ्यांचं लक्ष वेधलंय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 2 ऑक्टोबर : सोशल मीडियावर वादग्रस्त विधानांमुळे सगळ्यांचं लक्ष वेधणारा कमाल आर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नेहमीप्रमाणे केआरकेनं वादग्रस्त ट्विट करत सगळ्यांचं लक्ष वेधलंय. या ट्विटमध्ये त्यानं दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख केल्यामुळे त्याचं ट्विट आणखीनच चर्चेचा विषय ठरत आहे. नुकतेच  ट्विट करून त्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

ट्विट करून केआरकेनं लिहिलं, 'जेलमध्ये माझी 20 टक्के स्मरणशक्ती गेली, जिथे मी सुमारे 10 दिवस अन्नाशिवाय होतो. माझ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार माझी स्मरणशक्ती परत येणार नाही पण भविष्यात ती अधिक जाऊ शकते. जर मी मेले तर जनतेला हे लक्षात ठेवावे लागेल की आधी त्यांनी हे सुशांत सिंग राजपूतसोबत केले आणि आता ते माझ्यासोबत करत आहेत'.

यानंतर केआरकेने आणखी एक ट्विट करत व्हिडिओ न बनवण्याचे कारण सांगितले. अभिनेत्याने लिहिले, 'अनेक लोक मला विचारत आहेत की मी आणखी व्हिडिओ का बनवत नाही? मला अनेक गोष्टी आठवत नाहीत. जेव्हा मी रेकॉर्डिंग करतो तेव्हा मला माझी पुढची ओळ आठवत नाही. याचा अर्थ बॉलिवूडमधील काही लोक मला रोखण्यात यशस्वी झाले आहेत. आणि हेच मुख्य कारण आहे की मी पुनरावलोकन करणे थांबवले आहे'.

केआरकेच्या या ट्विटला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही जण त्याच्या तब्येतीची चिंता व्यक्त करत आहेत, तर काही जण त्याला ट्रोल करत आहेत. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्याचे व्हिडिओ कमी येत आहेत. तसेच ट्विटरवर सक्रिय असलेला केआरके देखील आजकाल ट्विट कमी करत आहे. केआरकेला जुन्या ट्विटसाठी अटक करण्यात आली होती आणि त्याने काही दिवस तुरुंगातही घालवले.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Sushant sing rajput, Tweet