मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पॉप सिंगर शकिराने नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीबरोबर रंगेहात पकडलं; 12 वर्षांचं नातं येणार संपुष्टात

पॉप सिंगर शकिराने नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीबरोबर रंगेहात पकडलं; 12 वर्षांचं नातं येणार संपुष्टात

पॉप सिंगर शकिराने नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीबरोबर रंगेहात पकडलं; 12 वर्षांचं नातं येणार संपुष्टात

पॉप सिंगर शकिराने नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीबरोबर रंगेहात पकडलं; 12 वर्षांचं नातं येणार संपुष्टात

शकिरा आणि स्पॅनिश फुटबॉलपटू गेरार्ड पिक (Gerard Pique) हे हॉलिवूडमधलं लोकप्रिय कपल आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं बोललं जातंय.

मुंबई, 03 जून:  पाश्चात्य म्युझिकची आवड आणि हॉलिवूड फॅन्स असणाऱ्यांना शकिराचं (Shakira) नाव माहिती नाही असं सहसा होत नाही. शकिरा आणि स्पॅनिश फुटबॉलपटू गेरार्ड पिक (Gerard Pique) हे हॉलिवूडमधलं लोकप्रिय कपल आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं बोललं जातंय. दक्षिण आफ्रिकेत 2010 मध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपच्या वेळेस ही जगप्रसिद्ध गायिका आणि फुटबॉलपटू एकमेकांच्या प्रेमात पडले; पण सध्या मात्र या दोघांमध्ये काही आलबेल नसल्याचं दिसतंय. बार्सिलोनामधल्या त्याच्या कॉले मुंटांनेरमधल्या बॅचलर हाउसवरून (calle Muntaner bachelor house in Barcelona) परतताना पिकला पाहिल्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात त्याच्या या घरात जाताना आणि घरातून बाहेर पडताना पिकला त्याच्या शेजाऱ्यांनी पाहिल्याचं वृत्त एल पिरिओडिको (by El Periodico) या माध्यमात प्रसिद्ध झालं आहे. बार्सिलोनात नाइट लाइफ एंजॉय करताना पिकला त्याचा मित्र रिकी प्युग आणि अन्य मित्रांबरोबर पाहिलं गेल्याचंही यात म्हटलं आहे.

शकिराने पिकला एका दुसऱ्या महिलेसोबत असताना पकडलं आणि त्यामुळे तो त्याच्या लग्नानंतरच्या घरात गेला नाही, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. याच कारणामुळे शकिरा आणि पिकने सध्या तरी वेगळं राहण्याचा निर्णय (Break up of Shakira-Pique) घेतल्याचं सांगितलं जात आहे. बार्सिलोनातली पिकची पार्टी अगदी नियंत्रणाबाहेर गेल्याचंही El Periodico च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. शकिरा पिकबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते; मात्र मार्चनंतर शकिराच्या सोशल मीडियावर पिकसोबतचा फोटो दिसत नाहीये.

सध्या पिक बार्सिलोनामध्ये राहत आहे. शकिराने तिच्या नुकत्याच गायलेल्या हिट गाण्यातले शब्ददेखील या दोघांच्या नात्याला तडा गेल्याचे संकेत देत असल्याचं बोललं जात आहे. Te Felicito हे शकिराचं Rauw Alejandro याच्याबरोबरचं गाणं भरपूर गाजलं आहे.

For completing you I broke into pieces; they warned me, but I did not pay attention. I realized that yours is false; it was the drop that overflowed the glass; do not tell me you’re sorry, that seems sincere, but I know you well and I know you lie. असे या गाण्याचे शब्द आहेत.

त्याचबरोबर शकिरा आणि पिकने सोशल मीडियावर त्यांचे नवीन एकत्र फोटो टाकणं टाळलं आहे. सेलिब्रिटीजसाठी अर्थातच ही चांगली गोष्ट मानली जात नाही. गेल्या 12 वर्षांपासून हे कपल एकत्र होतं; मात्र अजूनही ते अविवाहित आहेत. त्यांच्या या नात्यातून त्यांना मिलान आणि साशा अशी दोन मुलंही आहेत. अर्थातच शकिरा आणि पिकचे फॅन्स त्यांच्या ब्रेकअपची बातमी खोटी निघो अशीच प्रार्थना करत आहेत.

First published:

Tags: Break up, Football, Hollywood, Relationship, Singer