मुंबई 1 जुलै: ‘काश्मीर फाईल्स’ (Kashmir Files) चित्रपटातून सत्य परिस्थिती समोर आणून प्रेक्षकांना दाहक सत्य दाखवणारा दिग्दर्शक (Vivek Ranjan Agnihotri) विवेक अग्निहोत्री कायमच त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतो. विवेक त्याच्या मतांच्या बाबतीत कायमच ठाम असलेला पाहायला मिळतो. काश्मीर फाईल्सच्या (Kashmir Files director) या दिग्दर्शकाचं नाव ट्विट सध्या बरंच चर्चेत येत आहे. विवेकच्या बेधक अंदाजमुळे त्याला अनेकदा संकटाना सुद्धा तोंड द्यावं लागलं आहे. काश्मिरी पंडितांवर त्याने केलेल्या चित्रपटाच्या रिलीज वेळी सुद्धा त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. असं जरी असलं तरी या दिग्दर्शकाचा अंदाज कायमच थक्क करणारा असतो. त्याच्या नव्या कारनाम्याने तो पुन्हा एकदा हेडलाईनचा भाग होताना दिसत आहे. (Vivek Agnihotri twitter) विवेकने कालच त्याच्या ट्विटर हॅन्डल वरून नव्याने झालेल्या मुख्यमंत्र्यांना म्हणजेच एकनाथजी शिंदे यांना शुभेच्छा देत एक ट्विट केलं होत, “आता आम्ही न घाबरता जगू शकतो, एकनाथजी यांचं हार्दिक अभिनंद, देवेन्द्रजी तुमच्या प्रभावी नेतृत्वाचं सुद्धा अभिनंदन”. अशा शब्दात नव्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन विवेकने केलं. त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी पाठिंबा दिला तर काहींनी त्यांना ट्रोल सुद्धा केलं.
Congratulations @mieknathshinde
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) June 30, 2022
Congratulations @Dev_Fadnavis for your dynamic leadership.
At least, now we can live without fear. #JaiMaharashtra
यानंतर सुद्धा विवेकचं एक ट्विट बरंच गाजताना दिसत आहे. त्याने बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झावर (Dia Mirza) आपला निशाणा साधत तिला खडे बोल सुनावले आहेत. दिया मिर्झाने नुकतंच उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यांनंतर एक ट्विट करून त्यांच्या कारकिर्दीबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. “धन्यवाद उद्धवजी, तुम्ही लोकांबद्दल आणि आपल्या ग्रहाबद्दल काळजी व्यक्त केलीत. माझी कृतज्ञता मी व्यक्त करते. आपल्याला यापुढे सुद्धा देशाचं नेतृत्व करायच्या अनेक संधी मिळू दे” असं म्हणत दिया व्यक्त झाली होती. त्यावर विवेकने तिचा समाचार घेत असं ट्विट केलं,” कोणता ग्रह? बॉलिवूड प्लॅनेट?”
Which planet? Planet Bollywood? pic.twitter.com/VleaRuhxDT
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) July 1, 2022
विवेक हा बॉलिवूडच्या घराणेशाही आणि असमान वागणुकीबद्दल कायमच बोलताना दिसतो. त्याच्या या ट्विटने पुन्हा त्याच तडफदार व्यक्तिमत्त्व समोर आलं आहे. वर्क फ्रंटवर विवेक 2024 मध्ये ‘दिल्ली फाईल्स’ हा चित्रपट घेऊन येणार आहे. इतिहासातील अनेक राजकीय रहस्यांवर आणि महत्त्वाच्या घटनांवर तो चित्रपट घेऊन येताना दिसतो. त्याच्या राजकीय मतांबद्दल तो कायमच ठाम आणि स्पष्ट असल्याचं पाहायला मिळत.