मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Lataa Saberwal: शाहिद कपूरच्या ऑनस्क्रीन वहिनीला गंभीर आजार;आवाजही गमावण्याची शक्यता

Lataa Saberwal: शाहिद कपूरच्या ऑनस्क्रीन वहिनीला गंभीर आजार;आवाजही गमावण्याची शक्यता

शाहिद कपूरच्या ऑनस्क्रीन वहिनीला गंभीर आजार.

शाहिद कपूरच्या ऑनस्क्रीन वहिनीला गंभीर आजार.

Vivah Fame Shahid Kapoor Sister In Law: 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील राजश्री म्हणजेच लता सभरवाल यांनी आपल्या दमदार अभिनयाने घराघरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 25 मार्च- 'ये रिश्ता क्या कहलाता है' ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिकांमधील एक मालिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिका सुरुवातीला अक्षरा आणि नैतिक या दोघांभोवती फिरणारी असली, तर या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा तितकीच गाजली होती. त्यातीलच एक पात्र म्हणजे राजश्री गोयल-माहेश्वरी होय. ही भूमिका अभिनेत्री लता सभरवाल यांनी साकारली होती. दरम्यान लता यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती बिघडली असून, त्या आरोग्याच्या एका मोठया समस्येशी लढत आहेत.

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील राजश्री म्हणजेच लता सभरवाल यांनी आपल्या दमदार अभिनयाने घराघरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक वर्षांपासून लता लोकांच्या मनावर राज्य करत आहेत. शाहिद कपूर आणि अमृता राव यांच्या 'विवाह' या चित्रपटातूनही त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात त्यांनी शाहिद कपूरच्या वहिनीची भूमिका साकारली होती. अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रिय असते. लता सतत आपले फोटो व्हिडीओ शेअर करत आपल्या अपडेट्स देत असतात.

(हे वाचा:Parineeti Chopra: राजकीय नेत्याच्या प्रेमात पडली प्रियांका चोप्राची बहीण? 'या' नेत्याला करतेय डेट, समोर आले फोटो )

दरम्यान त्यांच्या एका नव्या पोस्टने मात्र सर्वच चिंतेत आहेत. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत, आपण आरोग्याच्या एका मोठ्या समस्येशी झुंज देत असल्याचं सांगत आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. अभिनेत्रीचे चाहते आणि इतर सेलिब्रेटीही या पोस्टमुळे चिंतेत आहेत. सर्वजण कमेंट्स करत त्यांची विचारपूस करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by (@lataa.saberwal)

लता सभरवाल यांना नेमकं काय झालंय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, लता यांनी शेअर केलेल्या पोस्टवर त्यांच्या घशात काही गाठी तयार झाल्या आहेत. चिंतेची बाब म्हणजे या आजारावर योग्य वेळेत उपचार नाही झालं तर त्यांना आपला आवाजही गमवावा लागू शकतो.ही माहिती समोर येताच चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. तसेच त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी धीर देत आहेत.

अभिनेत्रीची इन्स्टाग्राम पोस्ट-

लता यांनी आपल्या इंस्ता पोस्टमध्ये लिहलंय, 'कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्या घशात गाठी तयार झाल्या आहेत. त्यामुळे मला बोलण्यात अडचण येत आहे. मी नुकतंच डॉक्टारांकडून आलेय. त्यांना माझ्या घशात गाठ असल्याचं आढळलं आहे. त्यासाठी मला आठवडाभर पूर्ण विश्रांती घ्यावी लागणार असा त्यांचा सल्ला आहे. मला स्टिरॉइड्स देण्यात आले आहेत. कारण त्या आजारावर हा एकमेव उपचार आहे. ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. जर मी याकडे दुर्लक्ष केलं तर माझा आवाज कायमचा जाऊ शकतो. त्यामुळे मला थोडी भीती वाटत आहे'. असं म्हणत त्यांनी आपली हेल्थ अपडेट दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Entertainment, Shahid kapoor, Tv actress