मुंबई, 25 मार्च- बॉलिवूड आणि राजकारण यांचं नातं फारच जुनं आहे. काही सेलिब्रेटींनी राजकारणात प्रवेश केलाय. तर काहींनी राजकीय व्यक्तींशी लग्न करत संसार थाटला आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमदसोबत लग्नगाठ बांधली आहे. तर आता बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा असंच काहीसं शिजताना दिसून येत आहे. प्रियांका चोप्राची बहीण आणि लोकप्रिय अभिनेत्री परिणीती चोप्रासुद्धा राजकीय नेत्याच्या प्रेमात पडल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र याबाबत परिणितीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीय.
अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या अनेक दिवसांपासून पडद्यावर काही खास कामगिरी करु शकलेली नाहीय. मध्यंतरी तिचे अनेक चित्रपट फ्लॉफ झाले होते. अनेक दिवसांपासून ती चित्रपटांमधून गायब आहे. मात्र आता अभिनेत्री प्रचंड चर्चेत आली आहे. पण परिणीती आपल्या चित्रपटांमुळे नव्हे तर खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या लव्ह लाईफची सध्या जोरदार चर्चा होत आहे. कारण तिचं नाव आम आदमी पार्टीच्या खासदाराशी जोडलं जात आहे. हे खासदार इतर कुणी नसून राघव चढ्ढा आहेत. ज्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
(हे वाचा:Divyanka Tripathi ने भूकंपाचा Live Video शेअर करत केलं नको ते काम; भडकले लोक )
एखादा सेलिब्रेटी कोणत्याही व्यक्तीसोबत दिसून आला की, त्यांचे फोटो वेगाने व्हायरल होतात. आणि चाहत्यांना त्यांच्याबाबत उत्सुकता वाटायला सुरु होते. असंच काहीसं परिणीती चोप्रासोबत झालं आहे. या दोघांचे एकत्र फोटो पाहून चाहत्यांना आता परिणीती चोप्रा राघव चड्ढा यांच्या प्रेमात पडली आहे का? असा प्रश्न पडत आहे. दोघांचे एकत्र फोटो पाहून बी-टाऊनमध्ये पुन्हा एक लव्हस्टोरी सुरु झालीय की ही फक्त अनौपचारिक भेट होती. अशी चर्चा सुरु झाली आहे.
पंजाबमधील आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघेही मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर एकत्र दिसून आले आहेत. सोशल मीडियावर दोघांना एकत्र पाहून ते डिनर डेटसाठी रेस्टॉरंटमध्ये पोहोचल्याची चर्चा आहे. हे फोटो समोर येताच, सोशल मीडिया युजर्स असा अंदाज लावत आहेत की परिणीती आणि राघव चड्डा यांच्यात लव्हस्टोरी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे या दोघांनी एकाच रंगाचे कपडेही परिधान केले होते.
हे दोघे एकमेकांच्या संपर्कात कसे आले असतील? असा प्रश्न तुमच्याही मनात घोळत असेल. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, राघव आणि परिणीतीमध्ये ब्रिटनचं कनेक्शन आहे. दोघांनी ब्रिटनमध्ये शिक्षण घेतलंआहे. त्यामुळे कदाचित असंही होऊ शकतं की, दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखतात आणि फक्त चांगले मित्र आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Parineeti Chopra, Priyanka chopra