**मुंबई, 25 सप्टेंबर : ‘**महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमामुळे अनेक विनोदविरांना नवी ओळख मिळाली आहे. यातील एक विनोदवीर जीनं उभ्या महाराष्ट्राला पोट धरुन हसवलं आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. नुकतंच विशाखानं ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या आगामी भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा कार्यक्रम ‘बस बाई बस’ सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला या कार्यक्रमात सहभागी होत असलेल्या पहायला मिळतात. नवीन भागाचा प्रोमो समोर आला असून पुढच्या भागात सगळ्यांची लाडकी विशाखा पहायला मिळणार आहे. प्रोमोमधून या भागात खूप धमाल मस्ती होणार असल्याचं दिसतंय. नेहमीप्रमाणे सूत्रसंचालक सुबोध भावे अनेक प्रश्नांचा भडिमार करत आहेत. हेही वाचा - Pooja Sawant: ‘एक अत्यंत त्रासदायक…’, वैभव तत्ववादीच्या बर्थडेला हे काय बोलून गेली पूजा सावंत? प्रोमोमध्ये दिसतंय की सुबोध भावे विशाखाला म्हणतात, लोकं जनरली बर्फ डोक्यावर ठेवतात. हे ऐकूण विशाखा हसायला लागते आणि बोलते ‘बर्फ म्हणलं की मला खूप आनंद होतो. लहानपणापासून मला बर्फ खूप आवडतो. मी बर्फ पोळी खाऊ शकते, नुसताच बर्फ खाऊ शकते’. हे एकूण सुबोध भावे आश्चर्यकारक रिअॅक्शन देतात. तू काय त्यामध्ये मसाला वगैरे टाकतेस काय?. विशाखा बर्फाचा चुरा पोळीवर टाकून बर्फ पोळी खात असल्याचं एकूण सगळेच आश्चर्यचकित झाले.
दरम्यान, प्रोमो आल्यापासून पुढच्या भागाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. विशाखा तिची अनेक गुपित या कार्यक्रमात उलगडणार असल्याचं दिसत आहे. याशिवाय या भागात कॉमेडी तर होणारच यात काही प्रश्न नाही. त्यामुळे तिचे चाहते या भागासाठी खूप उत्सूक आहेत.