बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रेटी मित्र-मैत्रिणींच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. त्याच प्रकारे मराठी सिने सृष्टीतसुद्धा काही कलाकार मित्रांच्या जोड्या लोकप्रिय झाल्या आहेत.
त्यातीलच एक जोडी म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता वैभव तत्ववादी होय. या दोघांची मैत्री सर्वांनाच माहिती आहे.
आज वैभव तत्ववादी आपला वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्यावर चाहते आणि सेलिब्रेटी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
मग यामध्ये पूजा कशी मागे राहू शकते. पूजाने आपल्या खास अंदाजात लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्रीने काही शुभेच्छा देत लिहलंय, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तत्ववादी. एक अत्यंत त्रासदायक मात्र मरेपर्यंत हसवणारा असा मित्र. त्या यशासाठी चिअर्स, त्या प्रत्येक हस्यासाठी चिअर्स, त्या प्रत्येक भांडणासाठी आणि आपल्या मैत्रीसाठी चिअर्स'.