मुंबई, 12 डिसेंबर: आर्या(Aarya) ही डिज्नी प्लस हॉटस्टारची सर्वात लोकप्रिय वेबसिरीज आहे. या क्राईम(Crime) बेस्ड वेबसीरिजला खूप लोकप्रियता मिळाली. सुष्मिता सेनने या वेबसीरिजद्वारे ओटीटी पदार्पण केले. आता आर्याचा दुसरा सीझन(Aarya2) आला आहे. या सीझनचा प्रमियार नुकताच रीलीज झाला आहे. दरम्यान, वेब सिरीजच्या दुनियेत लहान वयाची अभिनेत्री वीरती वाघानीची(virti vaghani) चर्चा चांगलीच रंगली आहे.
आर्या 2 च्या नवीन सीझनमध्ये सुष्मिता सेन आर्याची मुख्य भूमिका साकारत आहे. विकास कुमार एसीपी खान, जयंत कृपलानी जोरावर, सिकंदर खेर दौलत, अंकुर भाटिया संगम, नमित दास जवाहर यांच्या भूमिकेत आहेत. प्रतिक्षा पनवार आणि वीरेन वजिरानी आर्याच्या मुलाच्या भूमिकेत तर वीरती वाघानी मुलगी आरूच्या भूमिकेत दिसत आहे.
या वेबसीरिजमध्ये सुष्मिता सेन आर्याच्या भूमिकेत सशक्त आणि प्रभावी दिसली आहे, परंतु वीरती वाघानीने तिच्या मुलीच्या भूमिकेत जबरदस्त अभिनय केला आहे. 2 ऑक्टोबर 2003 रोजी जन्मलेली वीरती फक्त 18 वर्षांची आहे पण सुष्मिता सेन सारख्या सिनेमातील दिग्गज कलाकारासोबत काम करताना तिचा आत्मविश्वास कमी झालेला दिसत नाही. दमदार कामगिरी करता दिसत आहे.
View this post on Instagram
तिने अगदी लहान वयातच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने व्हर्लपूल, क्वालिटी वॉल्स, क्लिनिक प्लस शैम्पू, डेटॉल साबण, नॉर सूप आणि कोलगेट सारख्या ब्रँडसाठी जाहिराती केल्या आणि नंतर 2008 मध्ये ती कलर्स टीव्हीवरील जय श्री कृष्ण या मालिकेत राधाच्या भूमिकेत दिसली. तिने 2011 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि अक्षय कुमार-अनुष्का शर्माच्या पटियाला हाऊसमध्ये दिसली.
आर्यामधील तिच्या व्यक्तिरेखेसाठी तिचे खूप कौतुक होत आहे. आर्याच्या नवीन सीझनची कहाणी खूपच रंजक आणि सस्पेन्सफुल आहे. या वेब सिरीजमध्ये एका आईची कथा आहे जी आपल्या पतीच्या मृत्यूनंतर आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी गुन्हेगारी आणि गुन्हेगारांच्या जगाशी लढते. या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेन एका आईच्या भूमिकेत आहे, तिच्या नवऱ्याला तिचा भाऊ आणि वडील मारतात.
आपल्या पतीच्या मृत्यूबद्दल जाणून घेण्यासाठी आणि आपल्या मुलांना वाचवण्यासाठी आर्या शेवटी गुन्हेगारीच्या जगात जाते. आर्याला तिच्या कुटुंबाची वास्तविकता कळते, तिला कळते की तिच्या पतीचा मारेकरी तिचे वडील आहेत. सीझन 2 मध्ये सुष्मिता सेन तिच्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आपल्या मुलांना शत्रूंपासून वाचवण्यासाठी तिचे वडील आणि भावासोबत लढताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.