नवी दिल्ली, 12 जानेवारी : बॉलीवूडमधील प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लीवर (Johnny Lever) यांची मुलगी जैमी लीवर (Jamie Lever) देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. जॉनी लीवर ज्याप्रकारे अनेक बॉलीवुड कलाकारांची नक्कल काढतात, अगदी तशाच प्रकारे जैमीदेखील अभिनेत्रींच्या मिमिक्री करताना पाहायला मिळते. जैमीने या कौशल्यामुळे आपली ओळख निर्माण केली आहे.
अद्याप मोठ्या पडद्यावर नाही, परंतू छोट्या पडद्यावर जैमीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या जैमी विविध टीव्ही शोमध्ये पाहायला मिळते. याशिवाय जैमीचं एक यूट्यूब चॅनलही आहे. येथे तिचे 2 लाख सबस्क्रायबर आहेत. सर्वच ठिकाणी लोक तिला खूप पसंत करतात. याशिवाय सोशल मीडियावरही तिच्या चाहत्यांची काही कमी नाही. ( Johnny Levers daughter Mimicry)
हे ही वाचा-गरिबांच्या रॉबिनहूडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; युवा नेता होण्याची इच्छा अपूर्ण
जैमी आपल्या यूट्यूब चॅनलवर कायम सक्रिय असते. तिचे व्हिडीओ खूप व्हायरलही होतात. अशात सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या लशीच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तिने कंगणा रणौत, सोनम कपूर, करीना कपूर, फराह खान आणि आशा भोसले यांची मिमिक्री केली आहे. या व्हिडीओमध्ये जैमीने या कलाकारांमधील कोरोन वॅक्सिनच्या चर्चेची मिमिक्री केली आहे.
लोकांना जैमीचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे. यूट्यूबवर आतापर्यंत या व्हिडीओला 5लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (Johnny Levers daughter Mimicry) आणि 36 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. याशिवाय कमेंटमध्ये लोक जैमीचं कौतुक करीत आहेत.