मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

राणू मंडललाही 'बचपन का प्यार'ची भुरळ; गाणं ऐकून युझर्स म्हणाले, 'गाते चांगलं...'

राणू मंडललाही 'बचपन का प्यार'ची भुरळ; गाणं ऐकून युझर्स म्हणाले, 'गाते चांगलं...'

राणू मंडलनेही सहदेव कुमारचं ‘बचपण का प्यार’ हे गाण गायलं आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राणू मंडलनेही सहदेव कुमारचं ‘बचपण का प्यार’ हे गाण गायलं आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राणू मंडलनेही सहदेव कुमारचं ‘बचपण का प्यार’ हे गाण गायलं आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  पनमुंबई 15 ऑगस्ट :  काही वर्षांपूर्वी राणू मंडल (Ranu Mondal) या गायिकेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. रेल्वे स्टेशनवर गाणारी राणू रातोरात स्टार झाली होती. संपूर्ण देशभरातून तिला प्रतिसाद मिळाला होता. अनेक शोमध्येही ती दिसली होती. ‘एक प्यार का नगमा’ (Ek Pyar Ka Nagma) हे गाणकोकीळा लता मंगेशकर याचं गाणं तिने गायलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर ती फारच व्हायरल झाली होती. दरम्यान याप्रमाणे काही दिवसांपासून एक लहान मुलगा देखील असाच व्हायरल होत आहे. सहदेव कुमार दिर्दो हा (Sahadev kumar Dirdo) ‘बचपन का प्यार’ (Bachpan Ka Pyar)  या गाण्याने सुपरहिट ठरत आहे. तर तो ही अनेक शोमध्ये दिसत आहे. इतकच नाही तर प्रसिद्ध रॅपर बादशाहने (Badshah) त्याला आपल्या गाण्यातही घेतलं होतं. तर ते गाणही आता ट्रेंडींगवर पाहा.ला मिळत आहे. राणू मंडलनेही सहदेव कुमारचं ‘बचपण का प्यार’ हे गाण गायलं आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सेक्रेड अड्डा (Sacred Adda) या सोशल मीडिया पेजवर तिचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांना पाहिला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Sacred Adda (@sacredadda)

  व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तर काहींनी म्हटलं की आवाज चांगला आहे. तर काहींनी म्हटलं की, ही अजूनही जिवंत आहे का अनेकांनी इमोजी लिहतही कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान दोन वर्षांपूर्वी सहदेव कुमार दिर्दोने गायलेलं गाण सध्या फारच चर्चेत आहे. छत्तीसगढचा सहदेवकुमार या गाण्यामुळे प्रसिद्ध होताना दिसत आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Photo video viral

  पुढील बातम्या