मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aryan khan च्या सुरक्षिततेसाठी Shahrukh Khan चा मोठा निर्णय; 'या' व्यक्तीकडे सोपवली जबाबदारी

Aryan khan च्या सुरक्षिततेसाठी Shahrukh Khan चा मोठा निर्णय; 'या' व्यक्तीकडे सोपवली जबाबदारी

"... तो तुम्हाला लडका लंबा जायेगा" म्हणत शाहरुख खानलाही घाबरवलं जातंय, नवाब मलिकांचा खळबळजनक गौप्यस्फोट

"... तो तुम्हाला लडका लंबा जायेगा" म्हणत शाहरुख खानलाही घाबरवलं जातंय, नवाब मलिकांचा खळबळजनक गौप्यस्फोट

गेल्या काही दिवसांपासून शाहरूख आणि त्याचं कुटुंब सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत. गेल्या महिन्यात (2 ऑक्टोबर 2021) शाहरूखचा मोठा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज केसप्रकरणी (Drugs case) अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला जवळपास 25 ते 26 दिवस एनसीबीच्या कोठडीमध्ये राहावं लागलं होतं. अनेक प्रयत्न करून शाहरूखनं आर्यनला जामिनावर बाहेर काढलं आहे.

पुढे वाचा ...

 मुंबई, 13नोव्हेंबर-  सेलेब्रिटींना सामान्य माणसाप्रमाणे कुठेही मोकळं फिरता येत नाही. कारण, ते कुठेही गेले की त्यांच्याभोवती चाहत्यांचा गराडा पडतो. अशा वेळी त्यांच्यासोबत असलेल्या बॉडीगार्डची त्यांना मोठी मदत होते. कितीही गर्दी असली तरी हे बॉडीगार्ड आपल्या मालकाला सुरक्षित बाहेर काढतात. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलेब्रिटी आपल्या सुरक्षेसाठी विश्वासू आणि फिट बॉडीगार्डची नेमणूक करतात. बॉलिवूडचा किंग खान शाहरूखकडेदेखील  (ShahRukh Khan)  असाच एक विश्वासू बॉडीगार्ड (Bodyguard) आहे. शाहरूखच्या बॉडीगार्डचं नाव रवी असून, शाहरूखचा त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे. अशा या विश्वासू व्यक्तीवर शाहरूख आता एक नवीन जबाबदारी सोपवण्याच्या तयारीत आहे. शाहरूखनं आपला मोठा मुलगा आर्यन  (Aryan Khan)  याच्या सुरक्षेची जबाबदारी रवीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून शाहरूख आणि त्याचं कुटुंब सातत्यानं चर्चेचा विषय ठरत आहेत. गेल्या महिन्यात (2 ऑक्टोबर 2021) शाहरूखचा मोठा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज केसप्रकरणी (Drugs case) अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला जवळपास 25 ते 26 दिवस एनसीबीच्या कोठडीमध्ये राहावं लागलं होतं. अनेक प्रयत्न करून शाहरूखनं आर्यनला जामिनावर बाहेर काढलं आहे. आर्यन बाहेर आला असला, तरी त्याची अद्याप पूर्णपणे सुटका झालेली नाही. त्याला अधूनमधून एनसीबीच्या  (NCB)  कार्यालयात हजर राहावं लागतं आहे. गेल्या काही दिवसांपासून आर्यनसोबत घडलेल्या घडामोडींमुळे शाहरूख आणि त्याची पत्नी गौरी काळजीत आहेत. ड्रग्ज प्रकरणाचा आपल्या मुलाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी खान दाम्पत्य त्याची जास्तीत जास्त काळजी घेत आहे. त्यामुळे आर्यनच्या सुरक्षेची जबाबदारी रवी नावाच्या बॉडीगार्डकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आर्यन पटकन कुणासोबत मिसळत नाही. त्याचे आणि शाहरूखचा बॉडीगार्ड रवीचे चांगले संबंध आहेत. रवीसोबत आर्यन मनमोकळेपणानं वावरू शकतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शाहरूखनं आर्यनची जबाबदारी रवीकडे सोपवण्याचा विचार केला आहे. येत्या काही दिवसांत शाहरूख आपल्या विविध चित्रपटांचं शूटिंग सुरू करणार आहे. अशा स्थितीमध्ये रवीने आर्यनसोबत मुंबईत राहावं, अशी शाहरूखची इच्छा आहे, जेणेकरून शाहरूखला आपल्या कामावर लक्ष देता येईल.

(हे वाचा:Aryan khan bail: 25 दिवसांनंतर 'मन्नत' पूर्ण; आर्यन खानची तुरुंगातून ... )  

'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरूखला आपल्या मुलासाठी एक विश्वासू बॉडीगार्ड पाहिजे होता. सध्या रवी ही एकमेव व्यक्ती आहे जिच्यावर तो डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. शाहरूख खान रवीला आपल्या कुटुंबाचाच भाग मानतो. रवी यापूर्वीदेखील अनेकदा आर्यन खानसोबत दिसला आहे. आर्यन आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आल्यापासून रवी त्याच्यासोबतच आहे. एनसीबीच्या कार्यालयात जातानादेखील रवी त्याच्यासोबतच असतो.गेल्या काही महिन्यांपासून आपल्या कामापासून दूर असलेला शाहरूख लवकरच शूटिंग सुरू करणार आहे. येत्या काही दिवसांत त्याच्या 'पठाण' चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे. पठाणमध्ये त्याच्यासोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या भूमिका आहेत. याशिवाय शाहरूखनं प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली यांचा एक चित्रपट साइन केला आहे. त्यात त्याच्यासोबत नयनतारा मुख्य भूमिकेत असण्याची शक्यता आहे.रवीला आर्यनची जबाबदारी दिल्यामुळे आता शाहरूखला स्वत:साठी नवीन बॉडीगार्ड शोधावा लागणार आहे.

First published:

Tags: Aryan khan, Entertainment, Shahrukh khan