साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या 'पुष्पा-द राईज' ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ माजवला होता. या चित्रपटाला अफाट यश मिळालं होतं. चित्रपटातील संवाद, गाणी आणि कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींनी प्रेक्षकांना वेड लावलं होतं.
फक्त देशातच नव्हे तर जगभरात या चित्रपटाला अफाट प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरसुद्धा रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. आता जगभरातील प्रेक्षकांना 'पुष्पा- द रुल' अर्थातच दुसऱ्या भागाची प्रतीक्षा लागून आहे.
पुष्पाच्या दुसऱ्या भागाचं शूटिंग सुरु झाल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाने श्रीवल्लीची भूमिका फारच सुंदररित्या साकारली होती.
पुष्पा २ मध्येसुद्धा रश्मिकाला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या भागात तिची भूमिका कशी असणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
अभिनेता फहाद फाजिल यामध्ये पुन्हा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. प्रॉडक्शन हाऊसन याबाबत मोठी अपडेट शेअर केली आहे.
अशातच आता रश्मिकासुद्धा या भागात दमदार भूमिकेत दिसणार अशी अपेक्षा चाहते व्यक्त सोशल मीडियावर करताना दिसून येत आहेत.
अभिनेत्री रश्मिकानेसुद्धा चाहत्यांच्या कमेंट्सवर प्रतिक्रिया देत म्हटलंय, 'आशा आहे की असंच असावं'.