जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Video: ‘हा स्टंट घरी करु नका…’; विद्युत जामवालनं डोळ्यांवर ओतलं वितळंत मेण

Video: ‘हा स्टंट घरी करु नका…’; विद्युत जामवालनं डोळ्यांवर ओतलं वितळंत मेण

Video: ‘हा स्टंट घरी करु नका…’; विद्युत जामवालनं डोळ्यांवर ओतलं वितळंत मेण

तो इतर सेलिब्रिटींप्रमाणे केवळ रुपेरी पडद्यावरील हिरो नाही तर खऱ्या आयुष्यात देखील तो एक दमदार स्टंटमॅन आहे. (Vidyut Jamwal Dangerous Stunt) सध्या त्याचा असाच एक अवाक् करणारा स्टंट सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 10 मे**:** विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) हा बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडिच्या अॅक्शन हिरोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. विविध प्रकारचे स्टंट आणि धमाकेदार फाईटिंग स्टाईलच्या जोरावर त्यानं बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेकदा त्याची तुलना ब्रूस ली, जॅकी चॅन, जेट ली, टोनी झा यांसारख्या हॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्यांशी देखील केली जाते. अन् काही प्रमाणात ही तुलना खरी देखील आहे. कारण तो इतर सेलिब्रिटींप्रमाणे केवळ रुपेरी पडद्यावरील हिरो नाही तर खऱ्या आयुष्यात देखील तो एक दमदार स्टंटमॅन आहे. (Vidyut Jamwal Dangerous Stunt) सध्या त्याचा असाच एक अवाक् करणारा स्टंट सोशल मीडियावर चर्चेत आहे. विद्युत जामवाल हा खऱ्या आयुष्यात देखील एक मार्शल आर्टिस्ट आहे. त्यानं आपला स्टंट दाखवण्यासाठी एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो डोळ्यांवर पट्टी बांधून फाईटिंगचा सराव करताना दिसत आहे. तलवारबाजी करत आहे. विशेष म्हणजे व्हिडीओच्या शेवटी त्यानं आपल्या डोळ्यांवर चक्क वितळतं मेण देखील ओतलं आहे. या व्हिडीओमधील स्टंट तुम्ही घरी करु नका अशी सूचना देखील त्यानं यामध्ये दिली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. बाहुबलीनं केली मोठी मदत;  कोरोना रुग्णांसाठी दान केला चित्रपटाचा पुर्ण सेट

जाहिरात

विद्युतनं जुडो, कराटे, कुंग-फु आणि कलरीपट्टू या फाईटिंग स्टाईलचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं आहे. त्याचे वडील भारतीय सैन्यात होते त्यामुळं लहानपणापासूनच त्याला व्यायामाची आवड निर्माण झाली. 3 वर्षांचा असल्यापासून तो मार्शलआर्ट शिकत आहे. त्याच्या कमांडो या चित्रपटातील स्टंट पाहून जॅकी चॅन देखील अवाक् झाला होता. सध्या त्याचा हा नवा स्टंट चर्चेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात