बाहुबलीनं केली मोठी मदत;  कोरोना रुग्णांसाठी दान केला चित्रपटाचा पुर्ण सेट

बाहुबलीनं केली मोठी मदत;  कोरोना रुग्णांसाठी दान केला चित्रपटाचा पुर्ण सेट

प्रतिकूल परिस्थितीत बाहुबली फेम प्रभासनं (Prabhas) मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानं आपल्या आगामी चित्रपटाचा पुर्ण सेटच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दान केला आहे.

  • Share this:

मुंबई 10 मे: देशातील कोरोना (coronavirus) रुग्णांची संख्या आता वाढतच चालली आहे. लॉकडाउनचा पर्याय स्विकारुनही कोरोनाची साखळी अद्याप तुटलेली नाही. मात्र यामुळं देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमालीचा वाढला. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड, औषधं, लसी यांचा तुटवडा जाणवत आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत बाहुबली फेम प्रभासनं (Prabhas) मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानं आपल्या आगामी चित्रपटाचा पुर्ण सेटच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दान केला आहे.

प्रभास एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचं नाव राध्ये शाम (Radhe Shyam) आहे. ही एक 70च्या दशकातील स्टोरी आहे. त्यामुळं पटकथेच्या मागणीनुसार दिग्दर्शकानं 70 च्या दशकातील रुग्णालयाचा एक सेट तयार केला होता. हा सेट इटलीमधील एका जुन्या रुग्णालयाची नक्कल होती. मात्र हा कोट्यवधींचा सेट आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दान करण्यात आला आहे. प्रभास आणि निर्मात्यांनी मिळून हा निर्णय घेतला. शिवाय या हॉस्पिटलमध्ये लागणारी औषधं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, पीपीई किट्स यांसारख्या अनेक वस्तुंची मदत त्यांनी केली आहे.

‘आई होऊन चूक तर केली नाही ना?’ गरोदर असताना समीराचं वजन झालं होतं 105 किलो

खरं तर शूटिंग पुर्ण झाल्यानंतर हा सेट हटवला जाणार होता. परंतु राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. अन् उपचारासाठी रुग्णालयांची कमतरता भासत होती. परिणामी आपला सेट अगदी हुबेहुब रुग्णालयासारखाच दिसतोय तर तो का देऊ नये असा विचार करण्यात आला अन् क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तो देऊ केला. मुळ सेटवरती बेड्सची संख्या कमी होती त्यामुळं अतिरिक्त बेड आणि डॉक्टर्सची वगैरे व्यवस्था करुन मदत केली जात आहे. दरम्यान प्रभासच्या या मदतीसाठी त्याचं सोशल मीडियाद्वारे कौतुक केलं जात आहे.

Published by: Mandar Gurav
First published: May 10, 2021, 12:27 PM IST

ताज्या बातम्या