Home /News /entertainment /

‘...म्हणून प्रियांकानं तुला तोंडावर पाडलं’; नेटकऱ्यानं केली सोना मोहपात्राची बोलती बंद

‘...म्हणून प्रियांकानं तुला तोंडावर पाडलं’; नेटकऱ्यानं केली सोना मोहपात्राची बोलती बंद

प्रियांकानं नंतर सोनालाच तोडांवर पाडलं अशी खिल्ली एका नेटकऱ्यानं तिची उडवली आहे. अर्थात यावर तिनं प्रतिक्रिया दिली, मात्र त्यामुळे उलट सोनालाच आता आणखी ट्रोल केलं जात आहे.

    मुंबई 5 जुलै: प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रींसोबत होणारे लैंगिक गैरव्यवहार ते बॉलिवूडमधील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. सध्या ती प्रियांका चोप्रा आणि सलमान खानमध्ये झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. सलमाननं वर्षभरापूर्वी प्रियांकावर जोरदार टीका केली होती. ‘कुछ लोग ऐसान फरामोश होते है’ असं म्हणत तिची खिल्ली उडवली. या वादात सोनानं प्रियांकाची बाजू घेत थेट सलमानशी पंगा घेतला होता. परंतु त्याच प्रियांकानं नंतर सोनालाच तोडांवर पाडलं अशी खिल्ली एका नेटकऱ्यानं तिची उडवली आहे. अर्थात यावर तिनं प्रतिक्रिया दिली, मात्र त्यामुळे उलट सोनालाच आता आणखी ट्रोल केलं जात आहे. प्रकरण नेमकं काय आहे? प्रियांकानं सलमानच्या चित्रपटाला नकार दिला होता. त्यामुळे चिढलेल्या सलमानने तिच्यावर जोरदार टीका केली होती. या वादात सोनानं प्रियांकाची बाजू घेत सोशल मीडियाद्वारे सलमानला सुनावलं होतं. दरम्यान अलिकडेच प्रियांकानं आपलं ‘अनफिनिश’ हे पुस्तक प्रकाशित केलं. यामध्ये तिने सलमान खानची तोंड भरुन स्तुती केली आहे. या स्तुतीमुळेच नेटकरी आता सोना मोहपात्राची खिल्ली उडवत आहेत. बालपणीच्या कटू आठवणीमुळे शरद केळकर भावुक; या कारणामुळे चिडवायचे लोक 28 वर्षांपूर्वी शेफाली शाह कशी दिसायची? व्हायरल झालं जुने Photo “तू प्रियांकाच्या बाजूने आवाज उठवला. परंतु तिने तुझ्याकडे दुर्लक्ष करत सलमान खानचीच बाजू घेतली. तुला तिनं तोंडावर पाडलं याबद्दल तू काय सांगशील?” असा सवाल तिला ट्विटरद्वारे केला गेला. यावर सोनानं “मी आता काय करु शकते.” असं उत्तर देत ट्रोलर्सला टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे आता तिला आणखी ट्रोल केलं जात आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Priyanka chopra, Salman khan, Social media troll

    पुढील बातम्या