मुंबई, 1 सप्टेंबर: आपल्या बिनधास्त अंदाजामुळे आणि वक्तव्यामुळे ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. विद्या बालनने आपल्या दमदार अभिनयानं आणि थाटणीच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. विद्या ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर ती चाहत्यांसोबत कनेक्ट राहते. अशातच विद्याचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. तिच्या या नव्या व्हिडीओनं सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
विद्या बालनने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या नव्या व्हिडीओमध्ये विद्या बाथरुममध्ये मस्ती करताना दिसत आहे. 'अनुपमा' च्या 'आपको क्या' या ट्रेडिंग डायलॉगवर मजेदार अभिनय करताना दिसत आहे. तिच्या विनोदी अंदाजावर चाहतेही फिदा झाले आहेत. विद्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंट येताना दिसत आहे.
View this post on Instagram
बाथटबमधील विद्याचा हा मजेशीर अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भुरळ घालत आहे. 'तू बेस्ट आहेस, तुमच्यासारखं कोणी नव्हतं आणि कोणी नसणार, पण कोणी काय बोललंय, हॉट', अशा अनेक भन्नाट कमेंट व्हिडीओवर येताना दिसत आहे. याशिवाय रुपाली गांगुली म्हणजेच अनुपमानंही या व्हिडीओवर कमेंट केली आहे. तिनं म्हटलं की 'माझ्या डायलॉगवर तुम्ही व्हिडीओ बनवलात हे माझ्यासाठी सन्मानापेक्षा कमी नाही'.
हेही वाचा - Priyanka Chopra: 'मी गेल्या 10 वर्षांपासून हॉलिवूडमध्ये....'; प्रियांका चोप्रानं शेअर केला 'तो' अनुभव
दरम्यान, विद्या बालन लवकरच 'नियत' या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती प्रतिक गांधी, इलियाना डिक्रुजसोबत आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप समोर आलेलं नाहीये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Bollywood News, Instagram post, Top trending, Vidya Balan, Viral video on social media