मुंबई, 8 मार्च- बॉलिवूडमधील धडाकेबाज अभिनेत्री विद्या बालन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. विद्या पडद्यावर अभिनेत्यांना टक्कर देते. विद्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिला सिनेमा चालवण्यासाठी कोणत्याही मोठ्या अभिनेत्याची गरज भासत नाही. अभिनेत्री नेहमीच स्त्री केंद्रित भूमिका साकारुन सर्वांची मनं जिंकते. आपल्या सहज-साध्या अभिनयाने विद्यावर लाखो चाहते फिदा आहेत. नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असणारी विद्या आता आपल्या एका बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
विद्या बालन आपल्या अभियाने चाहत्यांना अक्षरशः वेड लावते. विद्या नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारुन चर्चेत असते. सध्या विद्या बालनचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्रीने शर्टलेस फोटो क्लिक केल्याचं दिसत आहेत. अभिनेत्रीचा हा बोल्ड अंदाज पाहून सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत.
प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर अकाउंटवर विद्याचा हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो समोर येताच व्हायरल होत आहे. खरं सांगायचं तर हा फोटो विद्याने आता क्लिक केलेला नाहीय. डब्बू रत्नानी यांनी तब्बल आठ वर्षांपूर्वी आपल्या कॅलेंडरसाठी हे फोटो क्लिक केले होते. दरम्यान आता आठ वर्षानंतर डब्बूने हे फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. विद्याचे हे फोटो पुन्हा शेअर करण्यामागचं कारण काय? अभिनेत्री पुन्हा असा कोणता प्रोजेक्ट करतेय का? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात घोळत आहेत. तर 'डर्टी पिक्चर'चा दुसरा भाग येतोय कि काय असा सवालही अनेकांनी उपस्थित केला आहे.
View this post on Instagram
2015 मध्ये विद्या बालनने डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी हे फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटला आता आठ वर्षे उलटली आहेत. यामध्ये विद्या शर्टलेस दिसून येत आहे. अभिनेत्रीने आपल्या हातात वृत्तपत्र पकडलं आहे. शिवाय ती कोफीसुद्धा पिताना दिसत आहे. विद्याचा हा होत आणि बोल्ड फोटो त्याकाळात तुफान चर्चेत आला होता. त्यांनंतर आता पुन्हा एकदा विद्याचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
विद्या बालनने 'द डर्टी पिक्चर'सारखा अतिशय बोल्ड सिनेमा करत सर्वांनाच थक्क केलं होतं. यामध्ये तिने साऊथ अभिनेत्री सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. विद्यासोबत या सिनेमात नासिरुद्दीन शहा होते. नसिरुद्दीन शहासोबत विद्याने अनेक बोल्ड सीनसुद्धा दिले होते. हा फोटो पाहून सिनेमाचा सिक्वेल येत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र कोणतीही माहिती दिलेली नाहीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.