जाहिरात
मराठी बातम्या / देश / गरिबांच्या 'रॉबिनहूड'ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; राज्यातील युवा नेता होण्याची इच्छा अपूर्ण

गरिबांच्या 'रॉबिनहूड'ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; राज्यातील युवा नेता होण्याची इच्छा अपूर्ण

गरिबांच्या 'रॉबिनहूड'ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; राज्यातील युवा नेता होण्याची इच्छा अपूर्ण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे लोक घरीच असल्याने चोरी करता येत नसल्याचं त्याने सांगितलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 जानेवारी : रॉबिनहून (Robinhood) म्हटलं की गरीबांना मदत करणारा, श्रीमंताकडून पैसे घेऊन गरीबांचं पोट भरण्यासाठी दान करणारा चेहरा आपल्या समोर उभा राहतो. हे व्यक्तीमत्व केवळ चित्रपटांपूरते नाही तर नवी दिल्लीत अशाच एका रॉबिडहूडला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोहम्मद इरफान नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. हा व्यक्ती आपल्या टीमसह दिल्ली, पंजाब व देशाच्या इतर भागात चोरी करीत असे. या चोरीच्या पैशातून हा पठ्ठ्या महागडे कपडे व गाड्या खरेदी करायचा. (Police arrest poor Robinhood ) याशिवाय चोरीच्या पैशातून इरफान आपलं मूळ गाव सीतामढी येथे आरोग्य शिबीरं भरवायचा. पैसेही दान करीत होता. मात्र अखेर पोलिसांनी याला अटक केली आहे. याबाबत गुन्हे शाळेच्या डीसीपी मोनिका भारद्वाज म्हणाल्या की, इरफान उर्फ रॉबिनहूड याला 7 जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून जग्वार व निसार या दोन गाड्य जप्त करण्यात आल्या आहेत. या बाबत इरफानची चौकशी केली असता त्याने सांगितलं की, तो केवळ श्रीमंत भागातच चोरी करायला. चोरी करण्यापूर्वी तो घरांची रेकी करायचा. त्यानंतर व्यवस्थित प्लानिंग करुन घरात चोरीची तयारी केली जात. त्याच्या टीममध्ये एका महिलेसह आणखी तिघांचा समावेश आहे. (Police arrest poor Robinhood irfan) हे ही वाचा- ..आणि तो फोटो ठरला शेवटचा; केंद्रीय मंत्र्यांच्या पत्नीच्या मृत्यूने देश गहिवरला इरफान याला दिल्लीतून अटक करण्यात आली असून त्याच्या टीममधील सदस्यांना पंजाबमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. गेल्या वर्षी त्यांनी पंजाबमधील जलंदर येथे चोरी केली होती. यामध्ये त्यांनी घरातून हिरे, दागिने याबरोबरच 26 लाखांची कॅश चोरली होती. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून पिस्तुल, दागिने जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार इरफानला बिहारमधील प्रसिद्ध युवा नेता होण्याची इच्छा आहे. कोरोनामुळे त्यांचं काम ठप्प झालं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे लोक घरीच असल्याने चोरी करता येत नसल्याचं त्याने सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: bihar
  • First Published :
जाहिरात
जाहिरात