जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'ही' टीव्ही अभिनेत्री आहे विकी कौशलची खास मैत्रीण! थ्रोबॅक VIDEO पाहून आवरणार नाही हसू

'ही' टीव्ही अभिनेत्री आहे विकी कौशलची खास मैत्रीण! थ्रोबॅक VIDEO पाहून आवरणार नाही हसू

'ही' टीव्ही अभिनेत्री आहे विकी कौशलची खास मैत्रीण! थ्रोबॅक VIDEO पाहून आवरणार नाही हसू

सध्या सोशल मीडियावर अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) एक थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो आपल्या अभिनय शाळेतील मैत्रिणीसोबत दिसून येत आहे. ही मैत्रीण नेमकी कोण आहे? पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जानेवारी-   बॉलिवूड  (Bollywood)  कलाकारांचे थ्रोबॅक व्हिडीओ  आणि फोटो (Throwback Video & Photos )  पाहायला सर्वांनाच आवडतं. या जुन्या फोटो व्हिडीओमध्ये आपल्या लाडक्या कलाकारांमध्ये कमालीचा फरक दिसून येतो. त्यांचं ट्रासनफॉर्मेशन पाहून चाहते चकित होतात. शिवाय त्यांच्या जुन्या मित्र मैत्रिणींच्या बाबतीत आपल्यला समजत. असच काहीसं या व्हिडीओच्या बाबतीतसुद्धा आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेता विकी कौशलचा   (Vicky Kaushal)   एक थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो आपल्या अभिनय शाळेतील मैत्रिणीसोबत दिसून येत आहे. ही मैत्रीण नेमकी कोण आहे? पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अतिशय जुना असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ 2009 मधील आहे. अभिनेत्याने व्हिडीओ शेअर सांगितलं आहे, हा व्हिडीओ त्याच्या अभिनय शाळेतील आहे. खरं तर हा व्हिडीओ विकी कौशलच्या या अभिनय शाळेतील मैत्रिणीने शेअर केला होता. त्यांनतर विकीने तो रिशेअर केला आहे. विकी कौशलची ही खास मैत्रीण दुसरी कोणी नसून ‘ये है मोहब्बतें’  (Ye Hai Mohabbatein)   या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतील ‘सिमी’ अर्थातच शिरीन मिर्झा (Shireen Mirza)  आहे. वाटलं ना आश्चर्य? हो हे खरं आहे.

जाहिरात

शिरीन आणि विकी अभिनय शाळेत एकत्र होते. या ठिकणीच त्यांची मैत्री झाली होती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये विकी आणि शिरीन एकअ‍ॅक्ट सादर करताना दिसून येत आहेत. हा मजेशीरअ‍ॅक्ट असल्याचं लक्षात येत आहे. शिरीनने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे, ‘विकी कौशल मी हा व्हिडीओ शेअर करताना आधीच माझे हात जोडते, हाहाहा’. असं मजेशीर कॅप्शन तिने दिलं आहे. तर हाच व्हिडीओ शेअर करत विकीने लिहिलं आहे, ‘अभिनय शाळेतील चांगले दिवस २००९’ असं म्हणत विकीने या व्हिडीओची माहिती दिली आहे. (हे वाचा: Lovestory: अशी झाली होती धनुष आणि रजनीकांत यांच्या मुलीची पहिली भेट ) सध्या विकी कौशल आणि शिरीन मिर्झाने आपापल्या करिअरमध्ये चांगलंच यश मिळवलं आहे. शिरीन मिर्झा ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली होती. तर दुसरीकडे विकी कौशल बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक बनला आहे. सध्या दोघेही आपलं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत आहेत. नुकताच विकी कौशलने अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न करत आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे शिरीननेसुद्धा नुकताच हसन सरताजसोबत लग्न केलं आहे. हे दोघेही कलाकार मित्र सध्या आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात