कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल या दोन्ही प्रसिद्ध सेलिब्रिटीजच्या लग्नात 2500 रूपये किलो किंमत असलेले स्पे गेप्स, 1500 रूपये किलो किंमत असलेले Avocado आणि 3000 रूपये प्रतिकिलोचा भाव असलेल्या Sonophis चा समावेश आहे. त्यामुळं आता विक्की आणि कतरिनाच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना विदेशातून भाजीपाला आयात करण्यात आला आहे.
त्याचबरोबर कर्नाटकातूनही भाजीपाल्यांचे ट्रक मागवण्यात आलेले आहेत. त्यात पालक, गोबी आणि मशरूमसारख्या भाज्या आहेत.
या लग्नात स्वयंपाक करण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध आचाऱ्यांची टीम याठिकाणी आलेली आहे. त्यात जवळपास शंभर आचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना बरवाड्यातील एका धर्मशाळेत थांबवण्यात आलेलं आहे.
कतरिना आणि विक्की कौशलच्या या हायप्रोफाईल लग्नासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आलेली आहे. त्यात शंभर बाउन्सर्सचा समावेश आहे. जे हॉटेलमधील पाहुण्याना सुरक्षा देतील.
कतरिना-विकीच्या लग्नासाठी सिक्स सेंस बरवाड़ा फोर्ट हॉटेलला जबरदस्त पद्धतीनं सजवण्यात आलेलं असून कतरिनासाठी राजकुमारी सुट तयार करण्यात आलं आहे. त्याला गुलाबी रंगात तयार करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर यात गोलाकार शेपमध्ये बाथरूम्स तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळं आता या लग्नाची देशभरात चर्चा होत आहे.