मुंबई 7 मे: बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार वनराज भाटिया (Vanraj Bhatia) यांचं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून दिर्घ आजारामुळं ते त्रस्त होते. मुंबईतील राहत्या घरी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दिग्दर्शक अशोक पंडित यांनी ही सोशल मीडियाद्वारे ही दुखद बातमी चाहत्यांना दिली. (Vanraj Bhatia Passes Away) वनराज भाटिया यांच्या निधनामुळं बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. संगीतसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहते सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत.
वनराज यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट बॉलिवूडपटांना संगीत दिलं आहे. त्यापैकी 'जाने भी दो यारों', 'तरंग', 'द्रोह काल', 'अजूबा', 'बेटा', 'परदेस', 'चमेली और रूल्स: प्यार का सुपरहिट फॉर्मुला', 'खानदान' या चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत अधिक गाजलं. 1988 साली गोविंद निहलानी यांच्या तमस या चित्रपटासाठी संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. शिवाय 2012 साली त्यांना पद्मश्री या पुरस्कारानंही सन्मानित केलं गेलं होतं. असा हा महान संगीतकार आज बॉलिवूडनं गमावला आहे.
#InThisTogether: कोव्हिडग्रस्तांसाठी विरुष्काचा मदतीचा हात, उभारणार 7 कोटींचा निधी
The film industry lost one of the very well known music composers Vanraj Bhatia. He was not well for quite some time. His body of work has been a great inspiration to many . Heartfelt condolences to the family of this great music maestro . ॐ शान्ति ! pic.twitter.com/PuWt3O9tKd
— Ashoke Pandit (@ashokepandit) May 7, 2021
वनराज यांचा जन्म 1924 साली मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. मुंबईतील एलिफिन्सटन कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पुर्ण केलं. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. त्यामुळं संगीतातील उच्च शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले. परत येताच त्यांनी बॉलिवूड चित्रपटांसाठी गाणी तयार करण्यास सुरुवात केली. जवळपास तीन दशकं त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Rock music